Suraj Chavan : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) सोशल मीडियावर स्टार सूरज चव्हाणने (Suraj Chavan) आता शेवटच्या आठवड्यात प्रवेश केलाय. अगदी पहिल्या दिवसापासून सूरजचा प्रेक्षकांचा बराच पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे. ज्या परिस्थितीमधून सूरज इथवर आलाय त्यामुळे त्याचं विशेष कौतुक केलं जातंय. त्यावर अभिनेता अभिजीत केळकरने (Abhijeet Kelkar) केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. 


बिग बॉसच्या घरातलं सूरजचं वागणं, बोलणं या सगळ्याचं सुरुवातीपासूनच सगळ्यांनी कौतुक केलं. अगदी घरातल्यांनाही त्याचं वागणं आवडत होतं. घरातील प्रत्येक सदस्य घरातून बाहेर आल्यानंतरही त्याच्याविषयी भरभरुन बोलत होता. 


अभिजीतची सूरजसाठी पोस्ट काय?


अभिजीतने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, जी आर्थिक आणि सामाजिक समानता, संधी... 75 वर्षांची आपली लोकशाही देऊ शकली नाही, ती सूरजला सोशल मीडियावर आणि एका रिअॅलिटी शोने दिली...  






बिग बॉसच्या घरात सूरजचं कुटुंब


दरम्यान मागच्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात प्रत्येक सदस्यांचे कुटुंबिय भेटायला आले होते. त्यावेळी सूरजच्या दोन बहिणी आणि त्याची आत्या या घरात त्याला भेटायला आली. सूरजमुळे त्याच्या कुटुंबियांना इथपर्यंत पोहचता आलं. ज्यामुळे प्रेक्षकही भावुक झाले होते. दरम्यान सूरजचे कुटुंबिय जेव्हा घरात आले त्यावेळी त्या तिघींनाही सूरजला या ठिकाणी पाहून अगदी भारावुन आलं होतं. त्याचप्रमाणे घरात येण्याआधी सूरजच्या बहिणींनी त्यांच्या चप्पल देखील बाहेरच काढून ठेवल्या. हे सगळं सोशल मीडियावरही बरंच व्हायरल झालं.                                                                                                                             


ही बातमी वाचा : 


Natasa Stankovic : घटस्फोटाला फक्त दोनच महिने, पण नताशा पूलमध्ये करतेय 'या' अभिनेत्यासोबत मज्जा; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...