Mugdha Godbole Ranade Exit On Aai Kuthe Kay Karte Marathi Serial : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता या मालिकेच्या लेखिका मुग्धा गोडबोले रानडे (Mugdha Godbole Ranade) यांनी मालिकेला राम राम ठोकला आहे.


मुग्धा गोडबोले रानडे यांची खास पोस्ट 


मुग्धा गोडबोले रानडे गेल्या काही दिवसांपासून 'आई कुठे काय करते' या मालिकेचं लेखन करत आहेत. पण आता त्यांनी या मालिकेचे संवाद लिहिण्याचं काम थांबवलं आहे. खास पोस्ट शेअर करत त्यांनी यासंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"गेली साडेतीन वर्ष 'आई कुठे काय करते' या मालिकेचे संवाद लिहित होते. आता इथून पुढे मी ते लिहिणार नाही". 


मुग्धा गोडबोले यांनी पुढे लिहिलं आहे,"आई कुठे काय करते' मालिकेदरम्यान प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी ऋणी आहे. नवीन काम, नवीन आव्हान आणि नव्याने पात्रांमध्ये मन गुंतवण्याची सुरुवात लवकरच होईल... कृतज्ञ". 






मुग्धा गोडबोले यांच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यांनी लिहिलं आहे,"तुमचे लेखन आणि संवाद अतिशय भावायचे... आम्हाला आनंद दिल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील कामासाठी शुभेच्छा, योग्य निर्णय, मालिकेचे संवाद खूप उत्तम होते. आता तरी बंद करा ही मालिका, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत". 


मुग्धा गोडबोले यांनी अचानक मालिका सोडणार असल्याचा निर्णय घेतल्याने चाहते नाराज झाले आहेत. तसेच त्यांनी अचानक मालिका सोडल्याने प्रेक्षक अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. 'आई कुठे काय करते' ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे आता तरी बंद करा लांबलेली रटाळ मालिका, अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या लेखिका मुग्धा गोडबोले रानडे या अभिनेत्रीदेखील आहेत. अनेक लोकप्रिय मालिकांचा त्या भाग आहेत. 


संबंधित बातम्या


Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार कोण? जाणून घ्या त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल...