Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील सुपरहिट मालिका आहे. गेल्या साडे चार वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. मालिकेत सध्या एक धक्कादायक ट्विस्ट आला आहे. मालिकेतील हे वळण प्रेक्षकांना मात्र पसंत पडलेलं नाही. प्रोमोवर कमेंट करत मालिकाप्रेमी आपली नाराजी व्यक्त करत आहेत. अरुंधतीचा दुसरा नवरा आशुतोषचं निधन झाल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं आहे. मालिकेतील हा नवा ट्विस्ट पाहून प्रेक्षक वैतागले आहेत. अजून किती नवरे बदलणार? आशुतोषपेक्षा अनिरुद्धला मारायचं होतं, असं ते म्हणत आहेत. 


'आई कुठे काय करते' मालिकेचे चाहते नाराज


'आई कुठे काय करते' या मालिकेत एक धक्कायदायक वळण आलं आहे. मालिकेच्या नव्या वेळेसह मालिकेचं कथानकदेखील बदललं आहे. त्यामुळे नेटकरी मालिकेला आणि अरुंधतीला ट्रोल करताना दिसत आहेत. अरुंधतीला सुखात असलेली का दाखवत नाही, आशुतोषपेक्षा अनिरुद्धला मारायचं होतं, 'आई कुठे काय करते' आवडती मालिका होती. पण आता पाहणं बंद करणार, अजून किती नवरे बदलणार आहेस, नवीन प्रवासात आणि नव्या वेळेत तुझ्या लेकीलाही हेच संस्कार दे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी करत आपली नाराजी दर्शवली आहे. 


अपघाताचा प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले


आशुतोषच्या निधनाची बातमी समोर येताच अरुंधती पूर्णपणे गळून पडली आहे. आशुतोषच्या मृत बॉडीकडे ती एकटक पाहत असताना यश तिला सावरण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीतच अरुंधतीची वाईट अवस्था पाहून सर्वच जण तिला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळी अनिल अरुंधतीसाठी हळदीचं दूध घेऊन जातो. अरुंधतीला दूध प्यायला लावल्याने प्रेक्षक भडकले आहेत. माणूस मेला आणि दूध पाजताय, कसं दाखवताय, अशा कमेंट्स करत कथानकावरुन ते मालिकेला बोल लगावत आहेत. 






आई दुपारी काय करते?


'आई कुठे काय करते' ही मालिका आधी 7.30 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळत होती. पण आता मालिकेतील नव्या कथानकासह मालिकेची वेळदेखील बदलण्यात आली आहे. 18 मार्च 2024 पासून ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार दुपारी 2.30 वाजता स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर पाहायला मिळत आहे. 'आई कुठे काय करते' ही मालिका आधी टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर होती. पण हळूहळू मालिका कंटाळवाणी होत गेली. याचाच परिणाम मालिकेच्या टीआरपीवर झाला. टीआरपीमध्ये सतत होत असलेली घसरण पाहून ही मालिका दुपारी प्रसारित करण्याचा निर्णय चॅनलने घेतला.


संबंधित बातम्या


Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिका चालण्याची नेमकी कारणं काय? स्टार प्रवाह चॅनलचे सतीश राजवाडे म्हणाले,"चर्चा करायला..."