Aai Kuthe Kay Karteआई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.   आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) या अरुंधती ही भूमिका साकारतात. नुकतीच मधुराणी यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.


मधुराणी प्रभुलकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या सिडनी ट्रिपबाबत सांगितलं. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं,  'गेली 3 वर्षं माझं एक विशिष्ट रूटीन झालंय. 7/8 दिवस मुंबईत शूट करायचं आणि 2/3 दिवस पुण्यात स्वरालीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा. सोपं नव्हतं, नाहीये. long distance parenting तेही लेकीचं खूप कठीण असतं हो. गेल्या 3 वर्षात सलग असे 8/10 दिवस मी तिच्यासोबत घालवू शकलेले नाही. ह्याची रुखरुख असते, अपराधीपण असतं. आणि खूप सारा ताण असतो. माझी ही अवस्था ईश्वराला समजली असणार आणि माझ्यासमोर ऑस्ट्रेलिया ट्रिप ची ही संधी चालून आली. ह्या सगळ्याचा योग जुळवून आणणारा नेक माणूस म्हणजे सिडनीत राहणारा, कविमानाचा उमेश थत्ते. एक दिवस अचानक त्याचा फोन आला 'मी तुझ्या 'कवितेचं पान' चा मोठा फॅन आहे.इथे काही कवी आहेत. तुझा एपिसोड इथे करता येईल का ? 'मी म्हटलं, ' मला आवडेल पण स्वरालीला घेऊन येऊ शकत असेन तरच मी येते'त्यांनी माझी विनंती क्षणाचाही विचार न करता मान्य केली आणि हे सारं घडवून आणलं. 'आई... 'च्या टीम ने पण प्रचंड cooperate करत मला इतके दिवस सुट्टी घेऊ दिली. तिथले एपिसोड छान झालेच आणि माझी आणि स्वरलीच ही सुट्टी अगदी संस्मरणीय ठरली आणि ती तशी झाली ती आमच्या प्रेमळ होस्ट्स मुळे. उमेश- गौरी थत्ते आणि त्यांची मुलं अवनीश आणि अर्णव.'






पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले,  'आमची उत्तम राहण्याची सोय, खाण्यापिण्याची चंगळ तर ह्यांनी पुरवलीच पण स्वरालीची खूप प्रेमाने काळजी घेतली , खरंतर तिचे लाड केले, सारे हट्ट पुरवले असंच म्हणायला हवं.. सिडनीमधलं जिणं खूप धकाधकीचे आहे, त्यात आपल्या पाहुण्यांसाठी रजा काढून त्यांना ठिकठिकाणी घेऊन जाणं, उत्साहाने फिरवणे इतकं सोपं नाही हो.. त्यांनी केला तो पाहुणचार नाही तर जीव लावणं असच म्हणायला हवं.. सिडनी ट्रिप उत्तम झालीच पण स्वराली ला अजून एक प्रेमाची फॅमिली मिळाली आणि दोन दोन दादा सुद्धा...!!


 मधुराणी या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ त्या शेअर करतात. मधुराणी या त्यांच्या मुलीसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करतात. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Madhurani Prabhulkar: 'आपल्या माणसांची काळजी...'; आई कुठे काय करते मालिकेतील मधुराणी प्रभुलकर यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष