Television queen : एकता कपूर गेली सुमारे 25 वर्षं एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. तिला "टीव्ही क्वीन" म्हणून ओळखलं जातं. एकता कपूरच्या क्योंकि सास भी कभी बहू थी, कहानी घर घर की, कहीं किसी रोज़, कसौटी ज़िंदगी की या मालिकांनी वर्षानुवर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
साल 2001 मध्ये गोविंदा आणि सुष्मिता सेन यांच्या क्योंकि मैं झूठ नहीं बोलता या चित्रपटातून एकता कपूर यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. एकता कपूर आता फक्त टीव्हीवरच नव्हे, तर टॉप फिल्म मेकर्समध्ये आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपली छाप सोडतात. एकता कपूर संपत्तीच्या बाबतीत अनेक मोठ्या कलाकारांनाही मागे टाकते.
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांची कन्या एकता कपूर हिचा जन्म 7 जून 1975 रोजी झाला. 17 व्या वर्षी तिने जाहिरात दिग्दर्शक कैलाश सुरेंद्रनाथ यांच्यासोबत इंटर्नशिप करत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. केवळ दोन वर्षांनी, 1994 मध्ये तिने आपल्या आई शोभा कपूर यांच्यासोबत बालाजी टेलीफिल्म्सची स्थापना केली.
1995 मध्ये झी टीव्हीवरील हम पांच आणि मानो या ना मानो यासारख्या मालिकांमधून त्यांना पहिलं यश मिळालं. पुढच्या पाच वर्षांत त्यांनी डीडी मेट्रो आणि सोनी टीव्ही साठी इतिहास, कन्यादान, पडोसन यांसारख्या शो बनवले.
2000 मध्ये स्मृती इराणी मुख्य भूमिकेत असलेल्या क्योंकि सास भी कभी बहू थी या मालिकेमुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांनी कहानी घर घर की, कसौटी जिंदगी की, कुसुम, कहीं तो होगा, नागिन, बड़े अच्छे लगते हैं यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांचं निर्मिती केली.
1169 कोटींच्या कंपनीची मालकीण
एकता कपूर केवळ लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शकच नाहीत, तर त्या एक जबाबदार आई देखील आहेत. तिच्या मुलाचं नाव रवी कपूर असून त्याचा जन्म 27 जानेवारी 2019 रोजी सरोगसीद्वारे झाला. एकता या बालाजी टेलीफिल्म्स लिमिटेडच्या जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर आणि क्रिएटिव्ह हेड आहेत. या कंपनीची स्थापना 1994 मध्ये झाली आणि आजपर्यंत तिने 17 हजार तासांपेक्षा अधिक टेलिव्हिजन कंटेंट तयार केला आहे. Screener च्या आकडेवारीनुसार, बालाजी टेलीफिल्म्सचं मार्केट कॅपिटलायजेशन 1169 कोटी रुपये आहे.
एकता कपूर यांची एकूण संपत्ती किती?
एकता कपूर यांनी फक्त टीव्हीच नाही, तर बॉलिवूड आणि ओटीटीवरही आपली पकड मजबूत केली आहे. कमाईच्या बाबतीत एकता कपूर अनेक नामवंत कलाकारांना मागे टाकते. फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार, एकता कपूर यांची एकूण संपत्ती 13 मिलियन डॉलर (सुमारे 95 कोटी रुपये) आहे. ती दरमहा सुमारे 2.8 कोटी रुपये कमवते, आणि वर्षभराची एकूण कमाई सुमारे 30 कोटी रुपये आहे.
कोट्यावधींच्या घराची मालकीण
मुंबईतल्या जुहू या पॉश भागात एकता कपूर यांचं आलिशान घर आहे – कृष्णा बंगला, जिथे त्या आपल्या आई-वडिलांसोबत राहतात. या बंगल्या किंमत सुमारे 200 कोटी रुपये आहे. फक्त मुंबईतच नव्हे, तर इतर शहरांमध्ये आणि देशांमध्येही त्यांच्या मालमत्ता आहेत.
एकता कपूर यांची आलिशान गाड्यांची मालमत्ता
इतकी मोठी संपत्ती असलेली एकता कपूर खर्या अर्थानं रिअल लाइफ क्वीनप्रमाणे आयुष्य जगतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी 70 लाखांची जगुआर एफ-पेस कार घेतली होती. त्यानंतर तिच्याकडे मर्सिडीज-बेंझ S क्लास मेबॅक S500 या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे. ज्याची किंमत सुमारे 1.86 कोटी रुपये आहे. त्यांच्या गाड्यांमधली सगळ्यात महागडी कार म्हणजे बेंटली कॉन्टिनेंटल GT, ज्याची किंमत 3.57 कोटी रुपये आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या