Jannat Zubair Unfollows Rumoured Boyfriend Faisal Shaikh: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर (Social Media Influencers) आणि अभिनेत्री जन्नत जुबैरनं (Jannat Zubair) तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड (Rumoured Boyfriend) फैसल शेख उर्फ मिस्टर फैसूला (Faisal Shaikh) इन्स्टाग्रामवर (Instagram) अनफॉलो केलं आहे. ज्यामुळे दोघांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जन्नत आणि फैसू दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला होता. अशातच आता इन्स्टावर अनफॉलो करण्याच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा दोघेही चर्चेत आले आहेत.  

जन्नतकडून फैसू अनफॉलो

जन्नत इंस्टाग्रामवर फक्त 68 अकाउंट फॉलो करते आणि त्या अकाउंट्समध्ये फैसलचं अधिकृत अकाऊंट नाही. दरम्यान, मिस्टर फैसू अजूनही जन्नतला फॉलो करतोय. जन्नत ही सर्वात लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्सपैकी एक आहे. इंस्टाग्रामवर तिचे 49.6 दशलक्षाहून अधिक चाहते आहेत. तिनं फैसूला का अनफॉलो केलं? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जन्नत किंवा फैसल यांनी अद्याप या अनफॉलो घटनेबद्दल कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

सध्या सोनी लिववरचा सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया रिअॅलिटी शो भलताच चर्चेत आहे. यामध्ये फैसू स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. या शोच्या एका एपिसोडनंतर जन्नत आणि फैजलच्या नात्याबद्दल चर्चा वाढली. शोमध्ये फराह खाननं बोलता बोलता फैजल आणि जन्नतच्या लग्नाबाबत हिंट दिली. ज्यानंतप फैसू लाजल्याचं पाहायला मिळालं. 

फराह खान नेमकं म्हणाली काय? 

सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया रिअॅलिटी शोमध्ये फैसू स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. तो अनेकदा आपल्या चविष्ट डिशेजनी जजेसना इम्प्रेस करताना दिसून येतो. या शोच्या एका एपिसोडमध्ये होस्ट फराह खाननं फैसूच्या डिशचं कौतुक करताना म्हटलं की, आता तुझी आई तुला रेसिपी विचारणार आहे. त्यावर फैसू म्हणतो की, या शोनंतर माझं लग्न जमवणारच आहे. फैसूच्या वक्तव्यावर जराही वेळ जाऊ न देता फराह खान म्हणते की, "मैं तो करा के ही रहूंगी तेरी शादी, जन्नत की सैर तो कराऊंगी मैं", फराह खानच्या वक्तव्यानंतर फैसू लाजला.  

फैसूनं स्वतःला सिंगल असल्याचं सांगितलं 

जन्नतसोबतच्या सततच्या चर्चांनंतर फैजलनं जन्नतसोबत कोणत्याही प्रेमसंबंधांचा इन्कार केला. ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना फैजल म्हणाला की, "आम्ही बऱ्याच वर्षांपासून चांगले मित्र आहोत आणि यापुढेही चांगले मित्र राहू... आम्ही एकत्र अनेक प्रोजेक्ट्स केले आहेत आणि यापुढेही करत राहू. लोकांना असं वाटतंय, पण तसं काहीच नाही. पडद्यावर आमची केमिस्ट्री असायला हवी असं नाही. पडद्याबाहेरही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. मी सिंगल आहे..."

Mr Faisu त्याच्या व्हायरल झालेल्या टिकटॉक व्हिडीओमुळे प्रसिद्धीझोतात आला. 2023 मध्ये तो खतरो के खिलाडी 12 मध्ये सहभागी झाला. जिथे तो फर्स्ट रनरअप ठरला. त्यानंतर, त्यानं झलक दिखला जा 10 या डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. जन्नत आणि फैजल दोघेही लाफ्टर शेफ्समध्ये एकत्र दिसले होते. तसेच, स्प्लिट्सव्हिलाच्या नव्या सीझनमध्येही दोघे गेस्ट म्हणून उपस्थित राहिले होते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Yuzvendra Chahal RJ Mahvash: टीम इंडियाची मॅच सुरू असताना युजवेंद्र आणि आरजे महावश यांचं लिपलॉक किसिंग? 'तो' VIDEO व्हायरल