Tejaswini Pandit Emotional Post On Jyoti Chandekar: ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर ( Jyoti Chandekar) यांचं गेल्या वर्षी 16 ऑगस्ट 2025 रोजी निधन झालं. अनेक लोकप्रिय नाटकांमधून सिनेमांमधून आणि मालिकांमधून मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या अकाली एक्झिट सगळेच शॉक झालेले. मराठी कलाविश्वाला हा मोठा धक्का होता. 'ठरलं तर मग' या मालिकेतील पूर्णा आजीची भूमिका त्यांनी इतकी सुंदर साकारली होती की, चाहत्यांना पूर्णा आजीच्या भूमिकेत दुसऱ्या कोणाला पहावं लगेल, याची सवयच नव्हती. त्यांच्या निधनाने चाहत्यांना विश्वासच बसत नव्हता. दरम्यान, अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना जाऊन वर्ष झालं. वर्षभरानंतर त्यांची लेक अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने एक भावनिक पोस्ट शेअर केली. आईचा डायरी वाचतानाचा एक सुंदर फोटो शेअर करत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
काय म्हणाली तेजस्वी पंडित?
आईच्या निधनानंतर तेजस्विनीच्या आयुष्यात मायेचं छत्र हरपलं. आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली. आज आईच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनीने एक पोस्ट शेअर करत आईची माफी मागितली. तेजस्विनी म्हणाली, 'आई…1 वर्ष झालं! तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये…आय एम सॉरी, तुला थँक्यू म्हणता आलं नाही…'
तेजस्विनीसह अनेक कलाकारांनीही अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत.ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी (16 ऑगस्ट) निधन झालं. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या प्रगल्भ कलाकारांमध्ये ज्योती चांदेकर यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्यांनी साकारलेली मी सिंधुताई सपकाळ या सिनेमातील सिंधुताईंची भूमिका चांगलीच गाजली. अनेक मालिका नाटक आणि सिनेमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या. दरम्यान ठरलं तर मग मालिकेतील चाहत्यांची लाडकी पूर्ण आजी आता जगात नाहीये यावर चाहत्यांचा विश्वास बसत नसल्याचं अनेकांनी सोशल मीडिया अकाउंटवर कमेंट करत म्हटलेलं.
