Tanushree Dutta: अभिनेत्री तनुश्री दत्ता तिच्या थेट आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. तिनं अनेक चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 2018 साली अभिनेत्री #MEE TOOमुळे चर्चेत आली होती. या मोहिमेअंतर्गत तिनं सिनेसृष्टीतील अनेकांची पोलखोल केली होती. तसेच अभिनेता नाना पाटेकर यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. दरम्यान, तनुश्री दत्ता पु्न्हा एकदा चर्चेत आली आहे. पण चर्चेत येण्यामागचं कारण वेगळं आहे. तिनं नुकतंच प्रसिद्ध दिग्दर्शकावर गैरवर्तनाचा गंभीर आरोप केला आहे. या दिग्दर्शकानं अश्लील मागणी केल्याचा दावा अभिनेत्रीनं केला आहे. दरम्यान, तिनं या मुलाखतीतून दिग्दर्शकाच्या नावाचा खुलासा केला नाही.
तनुश्रीनं पिंकव्हिलाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने अनेक खुलासे केले. तनुश्री दत्ता म्हणाली, "हे प्रकरण चित्रपटाच्या सेटवर घडलं. त्याला मी, तू इतका मोठा दिग्दर्शक नाहीस, मग तू इतका उद्धट बोलतो आहेस? असा प्रश्न उपस्थित केला. यावर, कपडे काढ आणि नाच, असं त्यानं उत्तर दिलं. मला गाऊनला काढायचे होते. हेच तो योग्य पद्धतीने सांगू शकला असता. पण त्यावेळेस मी गप्प राहिले. त्या काळात मी खूप शांत होती. पण उपस्थित कलाकारांनाही तेव्हा वाईट वाटले होते. सर्वांना वाईट वाटले होते", असं तनुश्री म्हणाली.
मी त्याच्याविरोधात आवाज उठवला
"आता #MEE TOO मोहिमेदरम्यान, कुणीही कुणीही समोर येऊन बोलले नाही. परंतु, त्यावेळेस मला सर्वांनी पाठिंबा दिला होता. म्हणूनच दिग्दर्शकही गप्प राहिला होता. त्याची एक वाईट सवय आहे. त्याला मुलींसोबत कसे वागावे हे माहित नाही", असं तनुश्री म्हणाली. "तो पोशाख जरा अंगप्रदर्शन करणारं होतं. त्या गाण्यासाठी मला पाण्याखाली नाचायचे होते. दिग्दर्शकाने मला कपडे काढून नाचण्यास सांगितले होते. एखादी अॅक्ट्रेस किंवा मिस इंडियासोबत ही बोलण्याची पद्धत नव्हती. मी त्याच्याविरोधात आवाज उठवला", असं तनुश्री म्हणाली. "नंतर याबाबत मी मीडियासोबत शेअर केले. दिग्दर्शकाचे नाव न घेता मी मुलाखतीत जे काही घडलं ते सांगितलं", असं तनुश्री म्हणाली.
2018-2020 या काळात तनुश्री #MEETOOमुळे चर्चेत आली होती. तिनं तिच्या कारकिर्दीत बऱ्याच हिट चित्रपटात प्रमुख साकारली होती. भागम भाग, 36 चायना टाऊन, ढोल, रिस्क, गुड बॉय बॅड बॉय या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.