पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीमध्ये (PMC Election 2026) भाजपने प्रभाग क्रमांक २ मधून पूजा मोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र या उमेदवारीवरून प्रचंड टीका कार्यकर्त्यांकडून पक्षावर होत होती. त्यामुळे अखेर पूजा मोरे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पूजा मोरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं होतं, ट्रोलिंग'मुळे पुजा मोरेला पुणे मनपाची उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपने त्यांना तिकिट दिलं होतं. ट्रोलर्सने पुजा जाधव यांचे जुने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधी व्हिडिओ काढून ट्रोलिंग सुरू केलं होतं. अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे पत्रकार परिषद घेणार आहे.(PMC Election 2026)

Continues below advertisement

तर उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे-जाधव यांचे पती धनंजय जाधव यांनी आपली भूमिका मांडली, आम्ही आमच्या भूमिकेशी प्रामाणिक आहोत. माझी पत्नी सोशल मीडियाचा बळी ठरली आहे. आरक्षण मागतो बायको नाही हे चुकीच वक्तव्य तोंडात घातलं. प्रभाग क्रमांक 1ची माफी मागतो, असंही त्यांनी म्हटलं आहेय

तर उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत पूजा मोरे -जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले, त्या म्हणाल्या की, आजचा दिवस माझासाठी अवघड आहे. १० -१२ वर्षातला संघर्ष आठवतोय. मी गावातली मुलगी आहे. वडील ग्रामपंचायत सदस्य नाही. शेतकऱ्यांसाठी काम करत होते, मी शेतकऱ्यांची मुलगी आहे. शेतकऱ्यांसाठी आयुष्य झोकून दिलं. कमी वयात ५ गुन्हे अंगावर घेतले. मी महिलांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं. गुन्हे दाखल व्हायचे त्यावेळी शौचालयाच्या बाहेर झोपली आहे. बिन लग्नाची मुलगी होते, राजकारण घाणेरडं असतं असे सगळे म्हणतात, पण बापाने सगळं करू दिलं, लग्नानंतर नवी नवरी राहिली नाही, दुसऱ्या दिवशी कामासाठी बाहेर पडली, पहालगामच्या हल्ल्यावेळी काम केलं, ८ दिवस तिथं होतो. लाल चौकात आंदोलन केलं. दहशतवाद्यांना हिंदू मुस्लिम करायचं आहे असं समजून मी भूमिका मांडली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले. प्रभाग २ मधील अनेकांना माझ राजकारण सहन होत नाही, त्यांनी माझे व्हिडीओ बनवले. मुंबईत २० व्या वर्षी मराठा समाजाच्या भावना मांडल्या. विरोधकांची प्रभागाची टीम आहे. त्याची व्हिक्टिम मी बनत आहे. राहुल गांधीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. तेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन मी राहुल गांधींकडे गेले होते, असंही त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

Continues below advertisement

पुढे त्यांनी म्हटलं की, विरोधकांनी हे षडयंत्र केलं आहे. माझ्या पतीला देव मानून आणि सगळं ऐकून त्यांचे आभार मानते. भाजपचे आभार मानते. ८बाय १० च्या खोलीत धनंजय जाधव मोठे झाले आहेत. सामान्य माणसाचा बळी घेतला जातो. पोस्ट टाकून मुलीचं आयुष्य वाया जातं. मी भाजपमध्ये काम केलं, संघ परिवाराने मला समजून घेतले. मी स्वतः हिंदू आहे. हिदुत्वासाठी काम करेल. झालेल्या चुकांबद्दल माफी मागते. जिथे भाजपला गरज आहे तिथं काम करते. वाघीण जखमी झाल्यावर ती अजून जोरात काम करते. राजकीय आयुष्य आपल्या दोघांच आहे. माझामुळे तुमच्या राजकीय जीवन मागे गेलं असेल तर मला माफ करा, असं म्हणत पूजा मोरे-जाधव यांनी यावेळी नवऱ्याची माफी मागितली. आता आम्ही निवडणूक लढणार नाही सगळे अर्ज मागे घेतले, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. 

 Pooja More: नेमका भाजप कार्यकर्त्यांचा विरोध का?

भाजपने उमेदवारी दिलेल्या पूजा मोरे-जाधव यांनी पहलगाम हल्ल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया आणि फडणवीसांवर केलेले टीका यावरून भाजप कार्यकर्ते संतापले होते, त्यावरून त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात होते. या ट्रोलिंगनंतर पूजा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे यांच्या डोळ्यात पाणी आले. त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, माझा प्रवास खूप सामान्य घरातून झाला आहे. मी धनंजय जाधव यांच्याशी लग्न करून या पुण्यात राहायला आले. पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खात शेतकऱ्यांसाठी गुन्हे अंगावर घेतले. कोर्टाच्या चकरा मारल्या. न्यायालयात खटले लढवायला माझ्याकडे पैसे नसायचे या परिस्थितीतून मी पुढे आली आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मोठ्या पक्षाची उमेदवारी मिळत नाही. ते भाग्य माझ्या नशिबात आले होते. या पक्षातून एखाद्या पदावर जात तळागाळातील लोकांसाठी न्याय देण्याचं काम मला करायचे होते. परंतु माझ्या आयुष्यात झालेल्या एका छोट्या चुकीचा मोठा बाऊ करून माझ्याविरोधात षडयंत्र करण्यात आले. त्याच्या मला वेदना होत आहेत, अशी भावना पूजा मोरेंनी व्यक्त केली.(PMC Election 2026)

 Pooja More: कोण आहे पूजा मोरे-जाधव?

पूजा जाधव या मूळच्या गेवराईच्या असल्याची माहिती आहे. त्यांनी गेवराई येथून 2024 साली विधानसभा निवडणूकही लढवली होती. संभाजीराजे छत्रपती यांनी काढलेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. जुलै 2025 रोजी पूजा जाधव यांनी पुण्यामध्ये 5 हजार किलो चिकन मोफत वाटले होते, तेव्हापासून त्यांची चर्चा सुरू झाली होती.