Tanushree Dutta : तनुश्री दत्ताने (Tanushree Dutta) 2018 मध्ये सोशल मीडियावर #MeToo हा हॅशटॅग सुरू करून सर्वांना आश्चर्यचकित केले. ज्यामध्ये तनुश्रीने नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. तेव्हापासून तनुश्री तिच्या पोस्ट आणि मुलाखतींच्या माध्यमातून बॉलिवूड माफियांवर सतत बोलत आहे. त्याचवेळी, आता तनुश्री दत्ताने नुकत्याच केलेल्या पोस्टने बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तनुश्रीने आरोप केला आहे की, अनेक लोक तिला टार्गेट करत आहेत. 






इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर करत तनुश्री दत्ताने एक लांबलचक कॅप्शन लिहिले आहे, ज्यामध्ये तिने MeToo, नाना पाटेकर ते सुशांत सिंह राजपूतपर्यंतचा उल्लेख केला आहे. अभिनेत्रीने लिहिले की, 'मला कधी काही झाले तर मी तुम्हाला सांगते की, नाना पाटेकर, त्यांचे वकील, सहकारी आणि त्यांचे बॉलिवूड माफिया मित्र जबाबदार आहेत! 


तनुश्री दत्ताने पुढे असे लिहिले आहे की, 'त्यांचे चित्रपट पाहू नका. त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार टाका. माझ्या आणि PR बद्दल खोट्या बातम्या पसरवणार्‍या उद्योगातील सर्व चेहरे आणि पत्रकारांचा शोध घ्या. प्रत्येकाचे नीट निरीक्षण करा. त्याचे जीवन नरक बनवा कारण त्याने मला खूप त्रास दिला! कायदा आणि न्यायाच्या बाजूने मी अपयशी ठरले असेन पण माझा माझ्या देशातील लोकांवर पूर्ण विश्वास आहे.' 


तनुश्री दत्ताने 2018 मध्ये भारतात MeToo मोहीम सुरू केली होती. या दरम्यान, अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, 2009 मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी तनुश्रीच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता. नाना पाटेकर यांच्यावरील या आरोपामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. 'अपार्टमेंट' हा तनुश्रीचा शेवटचा चित्रपट होता. 


महत्वाच्या बातम्या :