Tamil actor Vishal engaged with actress sai dhanshika : तमिळ अभिनेता विशालने अभिनेत्री साई धनशिका यांचा साखरपुडा संपन्न झालाय. याबाबतची माहिती स्वतः विशालने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. अभिनेता विशाल याने त्याच्या   साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

अभिनेत्याने पोस्ट शेअर करून दिली माहिती

इंस्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर करताना अभिनेता विशाल म्हणाला,“या विश्वाच्या कानाकोपऱ्यातून माझ्या खास वाढदिवसाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्व प्रियजनांचे आभार. आज साई धनशिकासोबत झालेल्या माझ्या साखरपुड्याची आनंदवार्ता माझ्या कुटुंबासोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. मी खूप खुश आहे. नेहमीप्रमाणे तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्यावर राहोत, हीच इच्छा आहे.”

15 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात विशाल आणि साई

विशाल आणि साई धनशिकाने याच वर्षी मे महिन्यात एका कार्यक्रमात साखरपुड्याची घोषणा केली होती. हा दिवस खास होता कारण याच दिवशी विशालचा वाढदिवसही असतो. दोघे एकमेकांना मागील 15 वर्षांपासून ओळखतात आणि चांगले मित्रही आहेत.

दोघांमध्ये 12 वर्षांचे वयाचे अंतर

साखरपुड्याबरोबरच विशाल आणि साई धनशिकाच्या वयातील अंतरही चर्चेत आले. आपल्या या वाढदिवशी विशाल 48 वर्षांचा झाला आहे, तर धनशिकाचे वय सध्या 35 आहे. 20 नोव्हेंबर 1989 रोजी जन्मलेली साई धनशिका यावर्षी नोव्हेंबरमध्ये 36 वर्षांची होणार आहे. म्हणजेच दोघांमध्ये 12 वर्षांपेक्षा जास्त वयाचे अंतर आहे.

विशालने केली होती बालकलाकार म्हणून एंट्री

विशाल साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. तो प्रामुख्याने तमिळ इंडस्ट्रीत सक्रिय आहे. त्याचे पूर्ण नाव विशाल कृष्ण रेड्डी असले तरी तो विशाल या नावानेच ओळखला जातो. 1989 मध्ये त्याने तमिळ चित्रपट जदिक्केथा मूडी मधून बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. तर लीड अभिनेता म्हणून त्याची खरी ओळख २००४ मधील तमिळ चित्रपट चेलामई मधून झाली.

16 व्या वर्षी साई धनशिकाने केली करिअरची सुरुवात

साई धनशिका तेलुगू इंडस्ट्रीतील चर्चित अभिनेत्री आहे. तिने केवळ 16 वर्षांच्या वयात अभिनय करिअरला सुरुवात केली. 2016 मध्ये आलेल्या रजनीकांतच्या कबाली चित्रपटातून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली. या चित्रपटात तिने रजनीकांतच्या मुलीची भूमिका साकारली होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

सस्पेन्स सिनेमांचा पितामह, थ्रिलरचा 'थ' अन् हॉररचा 'ह' त्यानेच शिकवला; चित्रपटांचा चेहरा-मोहरा बदलणारा दिग्दर्शक