Tabu Trends on Social Media Over Viral Marriage Remark Rumour: हिंदी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री तब्बू आपल्या विधानांमुळे कायम लाईमलाईटमध्ये आली आहे. ती कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ही अभिनेत्री आपल्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखली जाते. 54 वयातही तब्बू अविवाहित आहे. चाहते असो किंवा तिचे  को-स्टार तिला कायम कधी सेटल होणार, असा प्रश्न विचारतात.  आतापर्यंत तिचे बऱ्याचदा नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले आहेत. मात्र, अद्याप तिनं विवाह  केला नाही. किंवा तिची विवाहाची कधी चर्चा झाली नाही.  दरम्यान,  बॉलिवूडची बोल्डनेस क्वीन तब्बूचे एक विधान सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. तिनं लग्नाबाबत शॉकिंग विधान केलं असल्याचं बोललं जात आहे. तब्बूच्या संदर्भातील पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  

Continues below advertisement

एक्स आणि इन्स्टाग्रामवर काही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये  तब्बूच्या धक्कादायक विधानाची माहिती आहे. व्हायरल होणाऱ्या पोस्टनुसार तब्बू म्हणाली, "मला केवळ बेडवर एक पुरूष हवा आहे. मी सध्या लग्न करत नाहीये.  मी माझे एकटे आयुष्य एन्जॉय करत आहे", असं ती म्हणाली.  टेलीचक्करने सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट शेअर केली आहे.   दरम्यान, तब्बु खरोखर असं म्हटलं की नाही, हे अद्याप समोर आलेले नाही. ही पोस्ट व्हायरल होताच तब्बूच्या टिमनं एक पोस्ट शेअर केली आहे. तब्बूच्या टिमनं हे विधान खोटं असल्याचं म्हटलं आहे. शिवाय, तब्बू लग्नाबद्दल  असे विधान करताना दिसणारा कोणताही व्हिडिओ समोर आलेला नाही.  दरम्यान, या पोस्टबाबत तब्बूनं अद्याप कोणतंही विधान केलं नाही.

तब्बू अजूनही अविवाहित 

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू सध्या अविवाहित आहे.  तिचे आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींशी नावे जोडले होती. मात्र, अद्याप तिनं विवाह केला नाही. तब्बू सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती तिच्या चाहत्यांसह  फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. दैनंदिनच्या निगडीत अपडेट्स देत असते. तब्बूची प्रत्येक पोस्ट  ऑनलाइन व्हायरल होते. तब्बू  शेवटची क्रू या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट देखील तिचा प्रचंड गाजला.  तब्बू लवकरच दृश्यम  3 या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. सध्या तिच्या आगामी बहुप्रतिक्षित दृश्यम  3 या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

Continues below advertisement

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बिग बॉस फेम बड्या अभिनेत्याचा MMS लीक, व्हिडिओ व्हायरल होताच सिनेसृष्टीत खळबळ; नेटकऱ्यांना वेगळाच संशय