Ejaz Khan Trends on Social Media: बिग बॉस फेम अभिनेता आणि प्रसिद्ध इन्फ्लुएंसर एजाज खान (Ejaj Khan) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावेळी हा विषय  एका कथित एमएमएस व्हिडिओशी संबंधित आहे.  जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.   या व्हिडिओमुळे एजाज खानचे नाव पुन्हा एकदा ट्रेडिंगमध्ये आले आहे.  अलिकडेच दिल्लीतील एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, एजाज खानचा प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणात एजाज खान नेमकं काय प्रतिक्रिया देतो हे पाहणं  महत्त्वाचं ठरेल.

Continues below advertisement

एजाज खानचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एजाज खान दिसत आहे. त्याच्यासोबत एक मुलगी देखील दिसत आहे. दोघेही एका बेडवर दिसत आहे. एजाज खानचा हा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ उडाली. हा व्हिडिओ नेमका खरा  आहे की, AIद्वारे तयार करण्यात आला आहे,  हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा व्हिडिओ फेक असावा, असा अंदाज देखील काही नेटकरी उपस्थित करत आहेत.  दरम्यान, व्हिडिओ व्हायरल होऊनही एजाज खानने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया  दिलेली नाही.  यामुळे हा व्हिडिओ खरा आहे की काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

फिट वर्षामुळे एजाज खान वादाच्या भोवऱ्यात

यापूर्वी दिल्लीस्थित सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फिट वर्षाने एजाज खानवर गंभीर आरोप केले होते.  वर्षाने तिच्या इन्स्टाग्रामवर एजाज खानसोबतच्या खासगी चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. त्या दोघांच्या स्क्रीनशॉट्स सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले. चॅट्समध्ये एजाज खान दिल्लीत असल्याचा दावा करतो, तसेच  तिला भेटीसाठी विचारतो.  त्या चॅट्समध्ये एजाजने  फोन नंबर देखील शेअर केल्याचं दिसत आहे.  मात्र, वर्षाने भेटण्यास स्पष्टपणे नकार दिला.  सध्या वर्षाने शेअर केलेले चॅट्सचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  

Continues below advertisement

वर्षा प्रकरणानंतर एजाज खान पुन्हा एकदा MMS व्हिडिओमुळे सोशल मीडियावर प्रकाशझोतात आला आहे.   हा व्हिडिओ खरा आहे की एआयद्वारे  तयार करण्यात आला आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.  या संपूर्ण  प्रकरणनंतर एजाज खानची अद्याप एक देखील प्रतिक्रिया समोर आलेली नाही.  सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेचे बाण सोडले जात आहे.  दरम्यान, त्याचे आणखी  काही व्हिडिओ समोर येण्याची शक्यता आहे.  आतापर्यंत एजाज खान त्याच्या विधानांसाठी चर्चेत आला होता. बिग बॉस 7 मध्ये सहभागी झाल्यापासून  तो अनेकदा कोणत्या न कोणत्या कारणामुळे  प्रकाशझोतात आला आहे.  दरम्यान, आता तो त्याच्या MMS लीक प्रकरणामुळे चर्चेत आला आहे.