Swati Deval Opens Up About Three Abortions in Interview: मराठीसह हिंदी मालिका अन् सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री स्वाती देवलने (Swati Deval) आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली. तिनं 'आम्ही सातपुते' (Amhi Satpute), 'माझी तुझी रेशीमगाठ' यांसारख्या मालिका अन् मराठी सिनेमात काम केलं. विविध मालिकांमधून तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. संघर्षाच्या जोरावर तिनं इथपर्यंतचा (Life Struggle) प्रवास गाठला. अलिकडेच तिने 'राजश्री मराठी'ला (Entertainment) मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला. 'तीन अबॉर्शन' झालं असल्याचं अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितलं. अभिनेत्रीने कोण कोणत्या गोष्टींचा खुलासा केला, पाहूयात.
मुलाखतीत स्वाती देवल म्हणाली की, ' लग्नाच्या वर्षभरातच मला दिवस गेले. पण त्यावेळेस एक प्रॉब्लेम झाला होता. खूप आतली गोष्ट आहे. सातव्या महिन्यात मला डिलिव्हरी करावी लागली, कारण बाळात थोडा प्रॉब्लेम झाला होता. त्यावेळेस मी 'रेतीवाला' या गाण्याचं शूटिंग करत होते. गाण्याच्या शूटच्या वेळेस मी खूप उड्या वगैरे मारल्या. डान्स केला होता. त्याचा त्रास झाला होता. शारीरिक वेदना झाल्या. मानसिक खच्चीकरण झालं. काम मिळत नव्हतं. तो काळ खूप भयंकर होता. तेव्हा असं वाटलं की, सगळं सोडावं. मुल बाळ झाल्यानंतर छान नोकरी करावी. अजून आपलं वय झालेलं नाही', असं स्वाती म्हणाली.
स्वातीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला (Swati Deval reveals she went through three abortions)
'आयुष्यात बरेच चढ उतारांचा सामना केला. पहिलं, दुसरं मग तिसरंही अबॉर्शन झालं होतं. अबॉर्शनची प्रोसेस खूप वाईट होती. पहिल्या प्रेग्नेंसीच्यावेळेस कळालं की, प्रॉब्लेम आहे. तेव्हा माझा नवरा तुषार देवल 'कॉमेडी एक्सप्रेस' करत होता. त्यावेळेला तुषार वॉटर किंग्डमला शूटसाठी गेला होता. मी सगळं एकटीने सांभाळलं. मग तुषारला कसं सांगायचं, असा प्रश्न पडला होता. कारण मला खूप वाईट वाटलं होतं. माझं मी सगळं केलं. दुसऱ्या अबॉर्शनच्या वेळेसही मी एकटी होते घरात. दुसऱ्यावेळेसही तुषार शूटिंगमध्ये व्यस्त होता. तेव्हा मी घरच्यांना बोलावून घेतलं. तिन्ही वेळेस तुषार नव्हता. तुषार शूटिंगमध्ये होता. त्याची यात चूक नाही, तो मला म्हणायचा की येऊ का? पण त्याला येता आलं नाही'.
'तिसऱ्या वेळेस तुषार रडला होता. तिसऱ्या अबॉर्शनंतर माझ्या मनात प्रेग्नेंसीविषयी भीती बसली होती. तुषार रडला होता, त्याला बाळाची खूप इच्छा होती. मलाही मुलं प्रचंड आवडतात. परत चान्स घेणार पण इतक्यात नाही, असं मी ठरवलं. मी कामात लक्ष दिलं. आतापर्यंत मी जे काही निर्णय घेतले, ते तुषारच्या विचाराने आणि तुषारसाठीच घेतले', असं स्वाती मुलाखतीत म्हणाली. यावेळी स्वाती भावुक झाली असल्याचंही पाहायला मिळालं. 'मला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम करण्याचीही संधी मिळाली होती. मंदारचा मला फोन आला होता. तेव्हा मी 'कळक नकळत' करत होते. त्याने माझं सुचवलं. पण मी तिथे पोहचू शकले नाही. हे काम सोडून मला जाता आलं नाही', असंही स्वाती म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
