Prabhas Freedom Fighter movie Fauji: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी. प्रभासचा आगामी बहुप्रतिक्षित 'फौजी' (Fauji) सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिना निमित्त ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'फौजी' या सिनेमाची प्रचंड चर्चा रंगली होती. दरम्यान, 15 ऑगस्टचे औचित्य साधत 'फौजी' या सिनेमाच्या फिल्ममेकर्सने 'फौजी' या सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. दरम्यान, 'फौजी' या सिनेमाच्या फिल्ममेकर्सने एक दमदार आणि जबरदस्त फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित केला आहे (Entertainment). ज्यामुळे सोशल मीडियावर अक्षरश: नेटकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नेटकऱ्यांनी कमेंटमधून हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली आहे.
हनु राघवपुडी दिग्दर्शित 'फौजी' हा सिनेमा अॅक्शन सिनेमा असून, हा चित्रपट 3 डिसेंबर 2026 रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे. माइथ्री मुव्ही मेकर्स आणि टी-सिरीजच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेला 'फौजी' हा बिग बजेट सिनेमा विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा तेलुगु, हिंदी, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हा सिनेमा वर्ल्डवाईड प्रदर्शित होणार आहे. सध्या 'फौजी' या सिनेमाच्या फर्स्ट लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये प्रभासचा रांगडी अवतार लक्षवेधी ठरत आहे. प्रभास या सिनेमात सर्वात रांगड्या आणि राकट अवतारासत दिसत आहे.
प्रभासचा आगामी सिनेमा 'फौजी'चा पोस्टर रिलीज (Prabhas Turns Freedom Fighter In Fouji First Look Poster)
प्रभास अनवाणी पायांनी पुढे चालताना दिसत आहे. तसेच रक्ताने माखलेले पांढरे बनियान, धोतर घालून दोन्ही हातात रिव्हॉलव्हर धरलेला दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील राग आणि रक्ताचे डाग एक थरारक अॅक्शन सीन असल्याचं स्पष्ट संकेत देत आहेत. या फर्स्ट लूकमध्ये ऐतिहासिक चारमिनार दिसत आहे. पोस्टरमधील लक्षवेधी भाग म्हणजे, प्रभासच्या हातात शस्त्र आहेत. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रपिता महात्मा गांधी हातात काठी घेऊन पुढे जात असताना दिसत आहेत. गांधींजींची शांततापूर्ण वाटचाल आणि प्रभासचा क्रूर, हिंसक मार्ग. या सिनेमातून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची न सांगितलेली पाने उजेडात येतील.
'फौजी' या सिनेमाचा टॅगलाईन 'A Battalion who Fights Alone', असं आहे. प्रभासने यात स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका साकारली आहे. तर, महात्मा गांधी यांची भूमिका कुणी साकारली? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. हा सिनेमा 3 डिसेंबर 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या 'फौजी' या सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे. या सिनेमातून कोणती कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार? यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. दरम्यान, प्रभासच्या आगामी पोस्टरमधील दमदार लूक पाहून त्याच्या चाहत्यांनी हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
