Swati Deval On Swami Samarth Divine Experience: श्री स्वामी समर्थांचे (Shri Swami Samarth) अनेक भक्त आहेत. आजवर स्वामींच्या महतीचा अनुभव अनेकांना आलाय. यात अगदी सेलिब्रिटीही मागे नाहीत बरं का... अनेक सेलिब्रिटींनी कित्येकदा बोलताना किंवा मुलाखतींमध्ये श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे किंवा समर्थांच्या दृष्टांतांचे अनेक किस्से ऐकवले आहेत. अनेक सेलिब्रिटी मोठ्या भक्तीभावानं श्री स्वामी समर्थांची मनोभावे पूजा करतात. तसेच, अनेकजण तर सेटवर मोकळ्या वेळात किंवा अडीनडीच्या वेळी श्री समर्थांचा धावा करतात असंही अनेकांनी सांगितलं आहे. असाच काहीसा अनुभव एका मराठी अभिनेत्रीलाही आलाय. स्वामी समर्थांच्या कृपेमुळे अगदी मरणाच्या दारातून परत आल्याचं एका मराठी अभिनेत्रीनं सांगितलंय. अभिनेत्री स्वाती देवलनं तिच्या गरोदरपणातीली अत्यंत वेदनादायी असलेल्या कठिण अनुभवाबाबत सांगितलंय. 

Continues below advertisement


समर्थांच्या अनुभवाबाबत बोलताना काय म्हणाली स्वाती देवल?


नुकत्याच 'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिनेत्री स्वाती देवलनं तिच्या गरोदरपणातल्या अत्यंत कठीण काळाबाबत सांगितलं. तिनं सांगितलं की, "स्वराध्य होण्याच्या आधी माझं दोनदा मिसकॅरेज झालेलं, एकदा तर सातव्या महिन्यात माझं मिसकॅरेज झालेलं आणि त्यावेळी तो मुलगाच होता... त्यावेळी मी फारच कठिण परिस्थितीतून वर आलेले. तेव्हा मी स्वामींचा जप करतच हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि स्वामींचा जप करतच बाहेर आले. तेव्हासुद्धा स्वामींनी वाचवलं, मी त्यावेळी काळी-निळी झाले होते... डॉक्टरांनी सांगिलेलं तुषारला की, माहिती नाही हिचं काय होईल, तुम्ही सह्या द्या... त्यानं थरथरत सह्या केल्या होत्या... तेव्हासुद्धा त्यानंही महाराजांचं स्मरण केलेलं. सहाव्या महिन्यात समजतं की, बाळाचे सगळे अवयव चांगले आहेत. स्वराध्यच्या वेळेला ते ऐकेपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. तेव्हा मी स्वामींचं कॉइन आणि दत्तगुरुंचं कॉइन आहे चांदीचं, ते मी हातात पकडून सोनोग्राफीला गेले होते. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, बाळ चांगलं आहे. त्यावेळी तिथून बाहेर आल्यानंतर मी जप करत होते, बाळ चांगलं असुदे बाकी सगळं नंतर बघू... कारण आधीचे अनुभव वाईट होते..." 


स्वाती देवलनं सांगितलं की, "महाराज हे प्रत्येकवेळेला बरोबर असतात, याची मला अनुभूती आली. मी बऱ्याचदा वाडीला जाते. तिथे दिगंबर पुजारींचं मोठं घर आहे. तिथेच गुरुप्रसाद पुजारीही आहेत, त्यांचेच पुत्र. त्यांना मी गुरु मानते. आम्ही नेहमी त्यांच्याकडे जातो. एकदा त्यांनी मला सांगितलेलं, तुमच्या दादर येथील मठात दर शनिवारी जा, काहीही मागू नकोस, काहीही बोलू नको, फक्त नमस्कार कर... तोरण ठेव... लक्ष ठेवा असंही म्हणू नकोस कारण, स्वामींचं लक्ष आहे. 11 ळा असं कर. माझे शेवटचे 2 शनिवार बाकी होते, माझी तब्येत बिघडली. त्यावेळी मला नवरा म्हणाला, घरात बस! महाराजांचं नामस्मरण कर. अचानक एक व्यक्ती दुपारी पादुका आणि रिसीट घेऊन आला. तर मी त्यांना म्हटलं मी नाही पैसे भरले, तर तो म्हणाला तुमच्याचसाठी आहेत, पाठवल्या आहेत. मी त्या घेतल्या. एक दिवस 1500 ची पावती मी त्या माणसाच्या नावानं स्वामींच्या चरणी ठेवली..."


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bollywood Actor On Swami Samarth Paduka Pujan: बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला...