Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे निर्घृण हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना कथितरित्या 20 कोटींची ऑफर दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ही ऑफर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडच्या माध्यमातून 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ आहे. शासकीय अंगरक्षक संतोष जाधव यांच्यासमोर ही ऑफर दिल्याचं यामध्ये बोललं जात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. यामधील आरोपी दादा गरुडच्या दाव्याचा हा व्हिडिओ आहे. या कथित व्हिडिओची एबीपी माझा पुष्टी करत नाही.

Continues below advertisement


संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला वर्ष उलटले 


दरम्यान, केज तालुक्यातील मस्साजोग गावचे लोकप्रिय सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला जवळपास वर्ष उलटले असले तरी, या प्रकरणाची राजकीय आणि सामाजिक धग अजूनही कायम आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या या हत्येमागे धनंजय मुंडेंचा राईट हँन्ड वाल्मिक कराडची खंडणी रॅकेटचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे संतोष देशमुखयांचे अपहरण करून अत्यंत क्रूर मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह गावाच्या हद्दीत सापडला होता. हत्येचा व्हिडिओ पाहून अवघ्या महाराष्ट्राचा थरकाप उडाला होता. सध्या वाल्मिक कराड जेलमध्ये असून या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लागू करण्यात आला आहे. राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून तपास जलदगतीने पुढे नेला. 80 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, यात आरोपींकडून केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ आणि छायाचित्रे महत्त्वाचे पुरावे ठरले आहेत.   या हत्येने केवळ बीड नव्हे, तर संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले.  


धनंजय मुंडेंचा राजीनामा 


संतोष देशमुख यांची खंडणीसाठीच हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर वाल्मिक कराडच्या सुद्धा मुसक्या आवळण्यात आल्या. यानंतर धनंजय मुंडे यांच्यावरही अत्यंत गंभीर आरोप झाले. मात्र, माझा काही संबंध नाहीच असे म्हणत सातत्याने धनंजय मुंडे यांनी स्वत:चा बचाव केला होता. मात्र, संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या क्रुरतेचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाचा उद्रेक झाला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.


इतर महत्वाच्या बातम्या