Swanandi Titkekar and Ashish Kulkarni : काही दिवसांपासून सिनेसृष्टीत कलाकार मंडळींच्या लग्नाचे सोहळे रंगत आहेत. नुकतच अभिनेत्री तितिक्षा तावडे हीने देखील अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्यासोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं सांगितलं. याआधी अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडूलकर, पियुष रानडे आणि सुरुची अडारकर यांनी देखील लग्नगाठ बांधली. त्यातलीच एक जोडपं म्हणजे अभिनेत्री स्वानंदी टीकेकर (Swanandi Tikekar) आणि गायक आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) आहेत. या दोघांनीही 25 डिसेंबर 2023 रोजी पुण्यात लग्न केलं. लग्नानंतर अनेकांनी त्यांच्या घरामध्ये अनेक बदल केलं, काही नवीन गोष्टींची खरेदी केली. स्वानंदीने देखील सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अभिनेत्री स्वानंदी टीकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी हे काही दिवासंपूर्वी विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या पोस्टवर देखील चाहत्यांनी आणि त्यांच्या मित्रमैणींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. स्वानंदी आणि आशिषने त्यांच्या संसाराला सुरुवात केली असून नुकतच स्वानंदीने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन घराच्या नेमप्लेटचे फोटो शेअर केले आहेत.
स्वानंदीच्या घराची नेमप्लेट
अभिनेत्री स्वानंदी टीकेकर हीने तिच्या घराच्या नेमप्लेटचे फोटो शेअर केले आहेत. अगदी साधी आणि सरळ असणारी ही नेमप्लेट सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. या नेमप्लेटमध्ये स्वानंदी आणि आशिष या दोघांच्याही नावाचा समावेश आहे. तसेच प्राजक्ताची फुलं देखील या नेमप्लेटवर आहे. तसेच स्वानंदीने तिच्या आवडीनुसार ही नेमप्लेट तयार करुन घेतली आहे. ही पोस्ट शेअर करताना स्वानंदीने म्हटलं की, ही नेमप्लेट पाहून मला जशी हवी आहे, तशीच आहे असंच वाटलं.
छोट्या पडदा गाजवलेली स्वानंदी
स्वानंदी ही अभिनेता उदय टिकेकर (Uday Tikekar) आणि गायिका आरती अंकलीकर (Arati Ankalikar-Tikekar) यांची मुलगी आहे. स्वानंदीनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. स्वानंदीनं दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दोबारा, असं माहेर नको गं बाई, अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई? या मालिकांमध्ये काम केलं आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत तिनं साकारलेल्या मिनल या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
स्वानंदीच्या नवऱ्याने गाजवलंय 'Indian Idol'
स्वानंदीचा पती अर्थात आशिष कुलकर्णी हा एक उत्तम गायक आहे. 2008 साली 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमात आशिष सहभागी झाला होता. त्याचा ‘रॅगलॉजिक’ नावाचा म्युझिक ब्रॅंड आहे. आशिषने 'इंडियन आयडॉल 12' (Indian Idol 12) गाजवलं आहे. अनेक मराठी सिनेमांसाठी त्याने गाणी गायली आहेत.