Sushas Joshi : ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी (Suhas Joshi) यांनी मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. त्याचसाठी त्यांना रंगभूमीवरील मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सुहास जोशी यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 


येत्या 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार दिला जाईल. त्याचप्रमाणे यंदा दिलं जाणारा हा 57 वा गौरव पुरस्कार आहे. या पुरस्कार रोख रक्कम 25 हजारांसह  स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप असेल. सुहास जोशी यांनी आजवर अनेक सिनेमे, नाटकं, मालिका यांमधून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.                                                                                                          


सुहास जोशी यांचा प्रवास


सुहास जोशी यांच्या व्यावसायिक अभिनयाची कारकीर्द ही 1972 मध्ये विजया मेहता दिग्दर्शित आणि जयवंत दळवी लिखित बॅरिस्टर नाटकापासून झाली. त्यानंतर सख्खे शेजारी, बॅरिस्टर आणि गोष्ट जन्मांतरीची ही त्यांची नाटकं तुफान गाजलीत. त्यांनी काशिनाथ घाणेकर यांच्यासह आनंदी गोपाळमध्ये भूमिका साकारली आहे.  बॅरिस्टरमधील त्यांची राधा, सई परांजपेंच्या सख्खे शेजारीमधील मध्यमवर्गीय गृहिणी या त्यांच्या काही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्याचप्रमाणे पुढे 80च्या दशकांतही  तेंडुलकरांच्या कन्यादान या नाटकातही त्यांची भूमिका होती. या नाटकात डॉ. श्रीराम लागू प्रमुख भूमिकेत होते. सुहास जोशींनी श्रीराम लागू यांच्याबरोबर केलेली अग्निपंख, नटसम्राट, एकच प्याला ही नाटके गाजली.


सुहास जोशी यांनी आतापर्यंत 25 मराठी नाटकं, अनेक हिंदी आणि मराठी मालिका,मराठी हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांना आतापर्यंत नाट्य दर्पण, मराठी ग्रंथ संग्रहालय, व्हिडिओकॉन स्क्रीन पुरस्कार, मुंबई दूरदर्शनचा सह्याद्री नवरत्न पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलंय. 


ही बातमी वाचा : 


Nikki Tamboli : 'ट्रॉफी त्याची पण धमाका माझ्याच नावाचा...', बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही निक्कीची टीवटीव सुरुच