Doctor on Sushant Singh Rajput: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आठवणींनी आजही चाहत्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. सुशांतनं त्यांच्या वांद्रे (Bandra) येथील राहत्या घरात गळफास घेत स्वतःचं आयुष्य संपवलं. त्याच्या अचानक अशा जाण्यानं संपूर्ण बॉलिवूड (Bollywood) हादरलं होतं. पण, सुशांत गेल्यानंतर मात्र, बराच गदारोळ झाला. त्याच्या मृत्यूबाबत अनेक खळबळजनक दावे केले गेले. या प्रकरणाला राजकीय किनारही मिळाली. हे प्रकरण इतर प्रकरणांशी जोडलं गेलं. आत्महत्या नसून सुशांतची हत्या झाल्याचंही बोललं गेलं. अनेक खळबळजनक दाव्यांनंतर अजूनही नेमकं काय आणि कसं घडलेलं? याबाबत खुलासा झालेला नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. अशातच, आता सुशांत सिंह राजपूतबाबत एका डॉक्टरनं केलेल्या वक्तव्यानं खळबळ माजली आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत म्हणजे, बॉलिवूडच्या गुणी अभिनेत्यांपैकी एक. सुशांतनं त्याच्या हयातीत तसे, फार थोटे चित्रपट केले. पण, त्यामध्येही त्यानं आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला ठसा उमटवला. सुशांतनं आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजन इंडस्ट्रीपासून केली होती. सुशांतच्या निधनाला इतकी वर्ष होऊनही त्याची जागा कुणीच घेऊ शकलेलं नाही. सुशांतचे कुटुंबीय अजूनही लढा देत आहेत आणि भावासाठी न्याय मिळावा म्हणून लढा देत आहेत. अशातच आता एका डॉक्टरनं केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांचा पायाखालची जमिनच सरकली आहे.
आपल्या युट्यूब चॅनलवर अध्यात्मिक गुरू, सायकिक आणि मीडियम म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर मनमीतकुमार यांनी म्हटलं आहे की, सुशांत सिंह राजपूतचा आत्मा अजूनही जगात आहे. गेली दोन वर्ष सुशांत सिंह राजपूत याचा आत्मा आमच्याकडे येतो. डोळे उघडले तर शेजारी सुशांत सिंहचा आत्मा बसलेला. सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्म्याशी झालेल्या पहिल्या मुलाखतीबद्दल सांगताना मनमीतकुमार म्हणाल्या की, त्या योगा करत होत्या, जेव्हा त्यांचं प्राणायाम संपलं, तेव्हा त्यांनी डोळे उघडले, त्यावेळी त्यांच्या जवळच सुशांत सिंह राजपूतचा आत्मा बसलेला होता.
डॉक्टर पुढे बोलताना म्हणाल्या की, "सुशांत सिंह राजपूतचा आत्मा माझं प्राणायाम संपेपर्यंत शांतपणे वाट पाहत होता. ज्यावेळी मी माझे डोळे उघडले, त्यावेळी सुरुवातीला मी खूप घाबरले आणि नंतर मला कळालं हा सुशांत सिंह राजपूतचा आत्मा आहे. तो मला सांगत होता माझी कहाणी अजून तू लोकांना का सांगत नाहीस? सुशांतची इच्छा आहे की, कोणीतरी त्याच्यावर पुस्तक लिहावं आणि कोणीतरी त्याचं सत्य बाहेर आणावं, त्याच्यावर पुस्तक प्रकाशित करावं."
सुशांत अजूनही इथेच आहे, त्याचा आत्मा अजून सुद्धा यात जगातून गेलेला नाही. यामागचे कारण त्याचा रहस्यमय झालेला मृत्यू हेच नसून लोकांचे त्याच्यावरचे प्रेम सुद्धा आहे ज्यामुळे तो अजूनही त्यांच्याशी भावनिक दृष्ट्या जोडला गेलेला आहे, असंही डॉक्टर मनमितकुमार म्हणाल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :