Numerology: प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं, हो की नाही? जो व्यक्ती प्रेमाच्या सागरात बुडालेला असतो, त्याला इतर काहीही दिसत नाही. असे म्हटले जाते की प्रेम ही जीवनातील सर्वात सुंदर भावना आहे आणि प्रत्येक व्यक्तीला त्याची गरज असते, आयुष्यात असे लोक भाग्यवान असतात ज्यांचे प्रेम त्यांना आशीर्वाद म्हणून येते. परंतु जगातील प्रत्येकाला खरे प्रेम मिळत नाही. अंकशास्त्रानुसार, आज आम्ही तुम्हाला अशा लोकांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या प्रेमाच्या मार्गात अनेक काटे असतात. त्यांनी एखाद्याला कितीही जीव लावला, तरी हे लोक खऱ्या प्रेमाला खूप तरसतात.. अंकशास्त्रानुसार अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल आपण जाणून घेऊयात...
जाणून घ्या कोणता मूलांक आहे?
अंकशास्त्रानुसार, 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 7 असतो. त्यांचा स्वामी केतू मानला जातो आणि असे म्हटले जाते की या लोकांना प्रेम जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
भावना मनात लपवून ठेवतात...
अंकशास्त्रानुसार, 7 क्रमांकाचे लोक खूप भावनिक असतात आणि त्यांच्या भावना व्यक्त होऊ देत नाहीत. ते त्यांच्या भावना मनात लपवून ठेवतात ज्यामुळे बऱ्याचदा गैरसमज निर्माण होतात
काहींना एकटे राहणे आवडते
अंकशास्त्रानुसार, या लोकांना एकटे राहणे आवडते, ज्यामुळे त्यांना अनेकदा जगापासून वेगळे वाटू लागते आणि यामुळे अनेक वेळा त्यांचा जोडीदार त्यांच्यापासून दूर जातो
नात्यात कोणाचाही हस्तक्षेप आवडत नाही
अंकशास्त्रानुसार, जर आपण त्यांच्या जोडीदारांबद्दल बोललो तर त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप आवडत नाही आणि बऱ्याचदा ही गोष्ट नात्यात दुरावा निर्माण करते
खरे प्रेम सहज मिळत नाही...
अंकशास्त्रानुसार, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 7 मूलांक असलेले लोक खूप रोमँटिक असतात, परंतु ते प्रेमाच्या बाबतीत थोडे अपरिपक्व असतात आणि प्रयत्न करूनही त्यांना खरे प्रेम सहज मिळत नाही
इतरांचा न्याय करण्यात तज्ज्ञ
अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 असलेल्या लोकांबद्दल असे म्हटले जाते की, ते इतरांचा न्याय करण्यात तज्ज्ञ असतात. हे लोक इतरांचा स्वभाव लवकर ओळखतात. मात्र ते त्यांच्या नात्याबद्दल खूप प्रामाणिक असतात.
हेही वाचा :
Numerology: जे लवकर प्रेमात पडतात, 'या' जन्मतारखेच्या लोकांचे खिसे नेहमीच पैशांनी भरलेले असतात, जोडीदाराला ठेवतात आनंदी
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)