Suraj Chavan:बिग बॉस सिजन 5 चा विजेता सूरज चव्हाण याचा आज विवाह सोहळा पार पडतोय. सुरज चव्हाण हा पुरंदरचा जावई होतोय. पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील मुलीशी त्याचा विवाह होतोय. पुरंदर तालुक्यातील खळद येथील माऊली गार्डन या मंगल कार्यालय मध्ये सध्या त्याचा विवाह सोहळा सुरू आहे. आज सायंकाळी 6 वाजता हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. सुरज चव्हाण यांच्या या विवाह सोहळ्याला कोण कोण सेलिब्रिटी येतेय.. याकडेच सर्वांचे लक्ष लागलेय. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या लग्नापूर्वीच्या विधींनी सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला आहे. सूरजच्या हळद आणि मेहंदीचे फोटो चाहत्यांनी अक्षरशः उचलून धरले आहे. सुरज चव्हाणची लग्नमंडपात गुलीगत एन्ट्री झालीय.

Continues below advertisement


मेहेंदीमध्ये झापुक झुपुक लिहिलं, व्हिडिओ व्हायरल


मेहंदीसमारंभात संजनाने आपल्या हातावर सूरजचे नाव कोरून घेतले असून, त्याचबरोबर सूरजचा चर्चित डायलॉग ‘झापुक झुपूक’ही तिने मेहंदीमध्ये लिहून घेतला आहे. ‘सूरज ♥ संजना’ अशी खास नोंदही तिच्या मेहंदीमध्ये दिसून आली. संजनाच्या या खास मेहंदी डिझाईन्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून चाहत्यांनी त्यांच्या जोडीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.




लग्नाच्या दिवशी सूरज चव्हाण राजेशाही अंदाजात निघाल्याचे दृश्यही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तब्बल 2 कोटी रुपये किंमतीच्या आलिशान गाडीतून त्याने विवाहस्थळी भव्य एंट्री केली. त्याच्या आगमनाचे व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, “सूरजची सटोरी एंट्री” अशी कमेंट्स चाहत्यांकडून करण्यात येत आहेत.




सूरज चव्हाणच्या या लग्नाला ‘बिग बॉस मराठी 5’ मधील त्याचे सहकारी स्पर्धकही उपस्थित राहणार असल्याचे समजते. ‘किलर गर्ल’ जान्हवी किल्लेकर, डीपी दादा उर्फ धनंजय पवार, अभिनेत्री इरिना रुडाकोवा यांसह अनेक जण जेजुरी-सासवड परिसरात लग्नसोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर अजून कोणते सेलिब्रिटी आणि राजकीय मान्यवर लग्नाला उपस्थित राहणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


 






दरम्यान, सूरज चव्हाण आणि डीपी दादा यांचा एक मजेदार व्हिडीओ चाहत्यांमध्ये खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डीपी दादा सूरजला उखाणा म्हणायला सांगतात. त्यावर सूरज विनोदी ढंगात म्हणतो, “आई मारी मातेचं दर्शन झालं. "लग्न आहे उद्या, दादा महाबळेश्वरचं काय झालं?”त्यांच्या या संवादावर डीपी दादांनी “कुठं कुठं जायचं हनिमूनला” हे गाणं बॅकग्राऊंडला लावून व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे सूरज लग्नानंतर महाबळेश्वरला हनिमूनला जाणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधलाय.सध्या सूरज-संजना यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगली आहे. काही तासांत त्यांचा भव्य विवाहसोहळा पार पडणार असून, कोणते सेलिब्रिटी उपस्थित राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.