Randeep Huda: बॉलीवूडचा अभिनेता आणि ‘जाट’चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा रणदीप हुडा (Randeep Huda) लवकरच बाबा होणार आहे. रणदीप आणि त्याची पत्नी लिन लाशराम यांनी इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही खुशखबर दिली. शेअर केलेल्या फोटोत दोघेही जंगलात बोनफायरसमोर बसलेले दिसतायत आणि कॅमेऱ्याकडे पाहत हसत पोझ देतायत. या रोमँटिक फोटोसोबत रणदीपने लिहिले आहे, “दोन वर्षांचं  प्रेम, साहस आणि आता... हा प्रवास अजून ‘वाइल्ड’ होणार आहे.” 

Continues below advertisement

या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हार्ट, इव्हिल आय अशा इमोजींसह अनेकांनी या जोडप्याला प्रेम  शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने टाकलेली पोस्ट काही क्षणातच व्हायरल झाली असून चाहतेही या  बातमीमुळे खुश झालेत.

वयाच्या 49 व्या वर्षी रणदीप बाबा होणार!

रणदीप आणि लिन यांच्यात 10 वर्षांचे वय अंतर आहे. अनेकांना ठाऊक नसेल, परंतु रणदीप हुड्डा सध्या 49 वर्षांचा आहे.त्याची पत्नी लिन लाशराम 39 वर्षाची आहे.  रणदीप आणि लिन लाशराम या दोघांमध्ये  10 वर्षांचे वय अंतर आहे. मात्र, दोघांच्या नात्यातील समज, प्रेम कायमच चाहत्यांना दिसून आलंय.

Continues below advertisement

दोन वर्षांपूर्वी झालं लग्न 

रणदीप आणि लिनने 29 नोव्हेंबर 2023 रोजी मणिपूरच्या इम्फाळमध्ये मेतेई परंपरेनुसार  सुंदर समारंभात लग्न केलं होतं.या समारंभाला दोघांचे जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. चाहत्यांना त्यांच्या खास दिवसाची सुंदर झलक मिळाली होती. रणदीप आणि लिनची पहिली भेट नसीरुद्दीन शाह यांच्या मोटली या थिएटर ग्रुपमध्ये झाली. सुरुवातीला साधी ओळख असलेले दोघे हळूहळू एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांच्यात प्रेम बहरलं. लॉकडाउनच्या काळात दोघांनी एकत्र वेळ घालवला.

रणदीप आणि लिनने 2022 मध्ये इंस्टाग्रामवर आपलं नातं अधिकृतपणे जाहीर केलं. 29 नोव्हेंबर 2023 रोजी इम्फाळ येथे मेईतेई परंपरेनुसार दोघांचा अतिशय सुंदर, निवांत आणि पारंपारिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत झालेल्या या लग्नाचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आणि ते खूप चर्चेत आले.