मुंबई : बिगबॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा विजेता सुरज चव्हाण (Suraj Chavan) नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आयु्ष्यात नेमकं काय चाललंय? हे सांगत असतो. सध्या त्याच्या घराचं बांधकाम चालू आहे. विशेष म्हणजे तो या घराच्या बांधकामात कामगारांसोबत स्वत: काम करताना दिसतोय. या कामाचा एक व्हिडीओ सध्या सुरज चव्हाणने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
सुरज चव्हाणाच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नेमकं काय आहे?
सुरज चव्हाणने नुकतेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो निळा शर्ट आणि काळ्या रंगाच्या जिन्समध्ये दिसतोय. व्हिडीओमध्ये त्याच्या घराचे बांधकाम चालू असल्याचे दिसत आहे. चार ते पाच कामगार एकत्र मिळून हे काम करत आहेत. पण याच घराच्या बांधकामात खुद्द सुरज चव्हाण सामान्य कामगाराप्रमाणे काम करताना दिसतोय. तो टोपली उचलून ते कामगारांना देतोय. तसेच नव्याने उभ्या राहात असलेल्या भिंतींना पाणी देताना दिसतोय.
सुरजच्या व्हिडीओला लाखोंनी लाईक्स
विशेष म्हणजे त्याने माझं घर असं कॅप्शन देत लवकरच बिग बॉसचा बंगला उभा राहील, असं समर्पक कॅप्शनही दिलंय. त्याच्या या व्हिडीओला अवघ्या एका तासाच्या आत दोन लाख लाईक्स आल्या आहेत. सोबतच त्याच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे.
झापुक झुपूक चित्रपटाचा मुहूर्त सोहळा
दरम्यान, बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा विजेता होताच त्याने मिळालेल्या पैशांतून घर बांधणार असल्याचं सांगितलं होतं. दिग्गज दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत त्याचा झाप्पुक झुप्पुक नावाचा एक चित्रपट येत आहे. त्याचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. या चित्रपटात सुरज चव्हाणसोबत अनेक दिग्गज कलाकार असणार आहेत. या चित्रपटाची नेमकी कथा काय असेल? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र सुरजसोबत पिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकेतील अभिनेते इंद्रनील कामत, हेमंत फरांदे अबीर गुलाल मालिकेतील पायली जाधव तसेच तुमची मुलगी काय करते मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे आदी दिग्गज कलाकार दिसणार आहेत.
हेही वाचा :
RJ सिमरनचा आत्महत्येचं नेमकं कारण काय? मोठी अपडेट आली समोर, खुद्द कुटुंबीयांनीच सांगितलं की....
सलमान खानचं फार्महाऊस म्हणजे अय्याशीचा अड्डा? भाईजानने थेट सांगून टाकलं, म्हणाला...