Suraj Chavan :   विधानसभेसाठी अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामतीच्या सोमवार 28 ऑक्टोबर रोजी अर्ज भरला. त्यानंतर बारामतीच्या सभेतून अजित पवारांनी बारामतीकरांना भावनिक सादही घातली. त्यांची पहिलीच सभा एका व्यक्तीमुळे चांगलीच गाजली. अजित पवारांच्या या सभेला सूरज चव्हाणनेही (Suraj Chavan) हजेरी लावली होती. इतकच नव्हे तर सूरजने दादांसाठी भाषणही केलं. 


विधानसभेच्या रणधुमाळीत बारामतीच्या हायव्होल्टेज लढतीने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. पुतण्याने काकांविरोधत बंड केल्यानंतर आता पुतण्याच काकांविरोधात बारामतीच्या मैदानात आहे. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर शरद पवारांनी बारामतीच्या मैदानात युगेंद्र पवारांना उतरवलंय. त्यामुळे बारामतीच्या या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय. 


'दादांना एकदम झापूकझूपक मतदान करा...'


अजित पवारांसाठी केलेल्या भाषणामध्ये सूरजने म्हटलं की, मी तुम्हा सगळ्यांचा लाडका सूरज चव्हाण...माझं दादांनी स्वप्न पूर्ण केलं आहे.  दादांनी गरिबांना मदत केली. त्यासाठी मी दादांचे आभार मानतो. आपल्या दादांना एकदम फुल्ल मतदान करा..एकदम झापूकझूपूक मतदान करा..


अजित पवारांमुळे सूरजची स्वप्नपूर्ती


दरम्यान अजित पवारांनी सूरजने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याची पुण्यात भेट घेतली. त्यावेळी अजित पवारांनी सूरजसाठी घर बांधून देण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. दसऱ्याच्या दिवशी अजित पवार आणि सूरजची भेट झाली. त्यानंतर नुकतच सूरजच्या घराचं भूमीपूजनही झालं. त्यामुळे आता काही महिन्यांमध्येच सूरजचं घरही तयार होणार आहे.  


कसं असणार सूरजचं घर?


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचनेनंतर सूरजच्या गावामध्ये त्याच्यासाठी घर बांधून दिलं जाणार आहे. त्यानंतर येत्या 9 महिन्यांमध्ये सूरजचं घर तयार होईल अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दोन बेडरुम, हॉल, किचन आणि बाहेर मोठा वऱ्हांडा असं या घराचं स्वरुप असेल. त्याचप्रमाणे 2000 स्केवअर फुटामध्ये या घराची बांधणी केली जाणार आहे. यामध्ये एक मास्टर बेडरुम देखील असणार आहे. तसेच पार्किंगसाठीही व्यवस्था केली जाईल. 



ही बातमी वाचा : 


Sai Tamhankar : 'होय आम्ही वेगळे झालोय,' सई ताम्हणकर आणि अनिश जोगचं ब्रेकअप, अभिनेत्रीनेच दिली कबुली