Suraj Chavan New Home Video Viral: बिग बॉस (Bigg Boss) मराठी फेम सूरज चव्हाणनं (Suraj Chavan) आपल्या नव्या आलीशान घरात नुकताच गृहप्रवेश केला आहे. सूरज चव्हाणच्या नव्या घराची नुकतीच वास्तुशांती पार पडली. याचा व्हिडीओ सूरजनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओवर सर्वचजण कमेंट करुन सूरजला नव्या घरासाठी शुभेच्छा देत आहेत. अशातच या कमेंट्समध्ये एका कमेंटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, ती कमेंट होती, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांची.
सूरज चव्हाण यानं बिग बॉस मराठीची (Bigg Boss Marathi) ट्रॉफी उंचावल्यानंतर अजित पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी अजित पवारांनी सूरजला घर बांधून देण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर अजित पवारांनी तात्काळ सूरजच्या घराचं काम सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या. अजित पवारांनी दिलेला शब्द पाळल्यामुळे सूरज चव्हाणचं खूप मोठं स्वप्न आता सत्यात उतरलंय. सूरज चव्हाणचं नवं घर एखाद्या आलीशान महालापेक्षा कमी नाही. सर्व अद्ययावत सुख-सुविधांनी सज्ज असलेल्या नव्या घरात सूरजनं आता नुकताच गृहप्रवेश केला आहे. सूरजनं आपल्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ त्याच्या ऑफिशिअल इन्स्टा अकाउंटवर शेअर केला आहे. त्याच व्हिडीओवर अजित पवारांनी कमेंट करुन सूरजला शुभेच्छा दिल्या आहेत.
अजित पवारांनी सूरज चव्हाणनं शेअर केलेल्या व्हिडीओवर कमेंट केली आहे. कमेंटमध्ये अजित पवारांनी म्हटलंय की, "सूरज, नवीन घरासाठी आणि भावी आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा!" सूरज चव्हाणच्या व्हिडीओसोबतच चाहते आता अजित पवारांनी केलेल्या कमेंटवरही लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
निवडणुकांच्या धामधुमीतच सूरज चव्हाणनं घेतलेली अजित पवारांची भेट
सूरज चव्हाणनं काही दिवसांपूर्वीच अजित पवारांची भेट घेतलेली. अजित पवारांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन सूरज चव्हाणनं भेट घेतल्यासंदर्भात माहिती देण्यात आलेली. तसेच, अजित पवार आणि सूरज चव्हाण यांच्या भेटीचे व्हिडीओ शेअर करण्यात आलेले. "बारामतीचा सुपुत्र आणि बिग बॉस मराठी विजेता सुरज चव्हाण यानं आज माझी सदिच्छा भेट घेतली. त्याच्या नवीन घराचं बांधकाम उत्तमरित्या पार पडत असून त्याबद्दल त्यानं माझ्याकडे समाधान व्यक्त केलं. यावेळी सुरजला पुढील वाटचालीसाठी, आयुष्यातील नव्या टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या.", असं कॅप्शन देत अजित पवारांनी सूरज चव्हाणच्या भेटीचे फोटो पोस्ट केलेले.
सूरजची लगीनघाई
रील स्टार आणि बिग बॉस फेम अभिनेता सूरज चव्हाणचं लग्न काही दिवसांवर आलं आहे. गुलिगत स्टारची लगीनघाई जोरात सुरू आहे. सूरज आपल्या मामाच्याच मुलीशी लग्नगाठ बांधणार आहे. सूरज चव्हाणचं लग्न 29 नोव्हेंबर रोजी असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता सूरज चव्हाणची लग्नाची थेट पत्रिकाच व्हायरल झाली आहे. सूरज चव्हाणच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींनी सोशल मीडियावर त्याच्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :