Sunjay Kapur last words : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा घटस्फोटीत पती संजय कपूर यांचे 12 जून रोजी निधन झाले. (Sunjay Kapur last words) यूकेमध्ये पोलो खेळताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी शेवटचे कोणते शब्द बोलले होते, याचा आता खुलासा झाला आहे. (Sunjay Kapur last words)
द टेलीग्राफच्या अहवालानुसार, संजय कपूर यांनी शेवटी जे वाक्य उच्चारले ते होते – "मी काहीतरी गिळले आहे." नंतरच्या रिपोर्ट्समध्येही उघड झाले की, संजय यांनी चुकून मधमाशी गिळली होती, जिने त्यांच्या घशात डंख केला. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यात अडचण येऊ लागली आणि अखेर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. (Sunjay Kapur last words)
संजय कपूर यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व असल्यामुळे त्यांचे पार्थिव भारतात आणण्यात वेळ लागत आहे. संजय यांचे सासरे अशोक सचदेव यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, अंतिम संस्कार दिल्लीमध्ये केला जाणार आहे. त्यांनी सांगितले, "पोस्टमार्टेम सुरू आहे. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पार्थिव भारतात आणले जाईल आणि अंत्यसंस्कार केले जातील."
मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंडमधील पोलो क्लबमध्ये संजय कपूर पोलो सामना खेळत होते, त्याच दरम्यान त्यांच्या तोंडात एक मधमाशी गेली. त्यामुळे संजय यांची श्वसननलिका (विंड पाइप) अडगली आणि त्यांना श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. या अस्वस्थतेमुळे आणि श्वास घेण्यास होणाऱ्या त्रासामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ही माहिती लेखक सुहेल सेठ यांनी ANI शी बोलताना दिली आहे. (Sunjay Kapur last words)
दरम्यान, अहमदाबादमध्ये घडलेला भीषण विमान अपघात संपूर्ण देशाला हादरवून गेला होता. या घटनेने संजय कपूरही खूप व्यथित झाले होते. त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधीच त्यांनी या दु:खद घटनेबद्दल X वर एक भावनिक पोस्ट लिहिली होती. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Sunjay Kapur last words)
इतर महत्त्वाच्या बातम्या
वजन वाढल्यानंतर चारी बाजूंनी ट्रोलिंग, बिपाशा बासूने अखेर प्रतिक्रिया दिली, म्हणाली...