Bipasha Basu Slams Trolls : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूचा (Bipasha Basu Slams Trolls) अलीकडेच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिच्या पर्सनॅलिटीमध्ये मोठे बदल झालेले पाहायला मिळत होते. आई झाल्यानंतर तिचं वजन देखील वाढलेलं आहे. मात्र, या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या वाढलेल्या वजनाबाबत तिला ट्रोल केलं. आता बिपाशा बासूने (Bipasha Basu Slams Trolls) या ट्रोल करणाऱ्यांना थेट प्रत्युत्तर दिलं असून स्पष्टपणे सांगितलं आहे की, अशा ट्रोलिंगने तिला काहीही फरक पडत नाही. (Bipasha Basu Slams Trolls)
श्वेता नायरकडून बिपाशा बासूला सपोर्ट
फॉर्मर मिस इंडिया आणि ब्युटी इन्फ्लुन्सर श्वेता विजय नायर हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत बिपाशाला ट्रोल करणाऱ्यांविरोधात आवाज उठवला. श्वेता नायर हिने महिलांना आई झाल्यानंतर शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांविषयी बोलत एक व्हिडीओ शेअर केला. याच व्हिडीओवर बिपाशाने कमेंट करत ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं.
"मी एक अत्यंत आत्मविश्वासू स्त्री आहे"
बिपाशा बसुने श्वेताचे आभार मानत लिहिलं – "तुझ्या थेट आणि स्पष्ट शब्दांसाठी धन्यवाद. मला आशा आहे की लोक नेहमी इतके उथळ आणि खालच्या पातळीवरचे राहणार नाहीत. महिलांनी दररोज निभावलेल्या असंख्य भूमिका लक्षात घेऊन त्यांचं कौतुक व्हावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं. मी एक सुपर कॉन्फिडेंट स्त्री आहे, जिच्याकडे एक प्रेमळ जोडीदार आणि मजबूत कुटुंब आहे."
"माझं आयुष्य मीम्स किंवा ट्रोल्सनी ठरवलेलं नाही"
पुढे बिपाशा म्हणाली – "मीम्स आणि ट्रोल्सनी कधीच मला परिभाषित केलं नाही किंवा मला मी जे आहे ते बनवलं नाही. मात्र ही सामाजिक मानसिकतेतील एक त्रासदायक बाब आहे. माझ्या जागी एखादी दुसरी स्त्री असती, तर ती या क्रूरतेने खूप त्रस्त आणि दु:खी झाली असती. त्यामुळे जर आपल्याकडे अधिक मजबूत आवाज असतील, आणि विशेषतः स्त्रियांनीच एकमेकींचं समर्थन केलं तर महिला आणखी उंच झेप घेतील. आपण अशा स्त्रिया आहोत, ज्या कोणाच्याही अडथळ्यामुळे थांबणार नाहीत."
या पोस्टवर बिपाशा बसुच्या पतीने – अभिनेता करण सिंग ग्रोव्हरनेही कमेंट करून श्वेता नायरचे आभार मानले आहेत. अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने देखील यावर सहमती दर्शवली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
करिश्मा कपूरचा घटस्फोटीत पती होता अमेरिकन? कागदपत्रांमुळे पार्थिव भारतात आणण्यास होणार उशीर?
दोन पेग घेण्यात काही वाईट नाही, जावेद अख्तर यांच्याकडून दारुची धर्मासोबत तुलना, 'पण लिमिटमध्ये..'