Sunjay Kapur Death Reason Revealed: करिष्मा कपूरचे (Karisma Kapoor) घटस्फोटीत (Divorced) पती आणि प्रसिद्ध बिझनेसमन संजय कपूर (Businessman Sanjay Kapoor) यांचं लंडनमध्ये (London) पोलो खेळताना निधन झालेलं. तेव्हापासूनच त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याच्या चर्चा रंगलेल्या. कधी त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack) झाल्याचं सांगितलं गेलं, तर कधी मधमाशी तोंडात गेल्यामुळे त्यांचा श्वास कोंडला आणि मृत्यू झाला, असंही कारण समोर आलं. अशातच आता त्यांच्या मृत्यूचं कारण समोर आलं आहे. संजय कपूर यांचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाल्याचं समोर आलं आहे.  

ब्रिटिश वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रविवारी त्यांची पत्नी प्रिया सचदेव कपूर (Priya Sachdev Kapur) यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली. या घटनेनंतर सासू आणि सून यांच्यात 30,000 कोटी रुपयांच्या सोना ग्रुपच्या नियंत्रणावरून वाद सुरू झाला आहे. सरे कोरोनर ऑफिसनं सांगितलं की, तपासात संजय कपूर यांचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाल्याचं उघड झालं आहे. त्यांच्या मृत्यूचं कारण लेफ्ट वेंट्रिकुलर हायपरट्रॉफी (LVH) आणि इस्केमिक हृदयरोग असल्याचं सांगण्यात आलं आहे.

LVH म्हणजे काय? 

LVH ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये हृदयाच्या डाव्या वेंट्रिकलची स्नायूंवर असलेली एक भिंत जाड होते, ज्यामुळे हृदयाला रक्त प्रभावीपणे पंप करणं कठीण होते. ही स्थिती अनेकदा हृदयाला सामान्यपेक्षा जास्त काम करावं लागतं किंवा उच्च रक्तदाबामुळे होते. तसेच, इस्केमिक हृदयरोगात, हृदयाच्या स्नायूंना पुरेसं रक्त आणि ऑक्सिजन मिळत नाही, जे सहसा धमन्या अरुंद झाल्यामुळे होतं. सर्वात सामान्य कारण म्हणजे, एथेरोस्क्लेरोसिस, ज्यामध्ये चरबी, कोलेस्टेरॉल आणि इतर पदार्थ धमन्यांच्या भिंतींवर जमा होतात.

सरे कोरोनर ऑफिसनं दिलेल्या माहितीनुसार, "या आधारावर, कोरोनर अँड जस्टिस अॅक्ट 2009 च्या कलम 4 अंतर्गत तपास बंद करण्यात येत आहे. पुढील तपासाची आवश्यकता राहणार नाही."

संजय कपूर यांचा मृत्यू 'फाऊल प्ले'; राणी कपूर यांचा दावा 

संजय कपूर यांची पत्नी प्रिया कपूरच्या निकटवर्तींयांनी NDTV ला दिलेल्या माहितीनुसार, असं सिद्ध होतं की, कोणताही 'फाऊल प्ले' नव्हता. त्यांनी असंही म्हटलंय की, काही दिवसांपूर्वी संजय कपूर यांची आई राणी कपूर यांना अहवाल देण्यात आला होता. असं असूनही, संजय कपूरची "आंतरराष्ट्रीय कटाचा भाग म्हणून हत्या" झाल्याचा राणी कपूर यांचा दावा धक्कादायक आहे. गेल्या आठवड्यात, राणी कपूरनं सरे पोलिसांना एक पत्र लिहून म्हटलंय की, तिच्याकडे 'विश्वसनीय आणि चिंताजनक पुरावे' आहेत, जे सूचित करतात की, संजय कपूर यांचा मृत्यू अपघाती किंवा नैसर्गिक नव्हता, पण त्यात 'फाऊल प्ले' असू शकतो.

संजय कपूर यांचा मृत्यू आंतरराष्ट्रीय कटाचा भाग : राणी कपूर 

संजय कपूर यांची आई राणी कपूरनं 'फाऊल प्ले' दर्शवणाऱ्या कागदपत्रांचा उल्लेख केलाच. पण, त्यासोबतच त्यांनी प्रिया कपूरवर आर्थिक फायद्यासाठी कटात सहभागी असल्याचा आरोप केला. राणी कपूरनं लिहिलंय की, "त्याचा मृत्यू यूके, भारत आणि कदाचित अमेरिकेतील लोक आणि संघटनांचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असू शकतो."

राणी कपूर यांचं पत्र म्हणजे, कुटुंबात सुरू असलेल्या वादाला नवं वळण देणारं आहे, जेव्हा राणी कपूरनं सोना कॉमस्टारच्या बोर्डाला वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्याची विनंती करणारा ईमेल पाठवला होता. त्यावेळी त्यांनी स्वतः सोना कॉमस्टार आणि सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज लिमिटेड या सोना ग्रुपची 'प्रमुख भागधारक' म्हणून वर्णन केलेलं. तसेच, त्यांनी दावा केला की, त्यांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या दुःखात तिला काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडलं गेलं. त्यांनी त्यांची सून प्रिया सचदेव कपूर यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि कुटुंबाच्या वतीनं बोलण्याचा तिचा दावा "माझ्या दबावाखाली स्वाक्षरी केलेल्या कागदपत्रांवर" आधारित असल्याचं सांगितलं. राणी कपूर म्हणाली की, तिच्याकडे कंपनीच्या कारभारात 'घोर अनियमितता' उघड करणारी माहिती आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sachin Pilgaonkar On Laxmikant Berde: 'नवरा माझा नवसाचा सिनेमात मला लक्ष्याला घ्यायचं होतं, पण...'; लक्ष्मीकांत बेर्डेंनी का दिलेला सचिन पिळगांवकरांसोबत काम करायला नकार?