Sachin Pilgaonkar On Laxmikant Berde: मराठी सिनेसृष्टीसोबतच (Marathi Film Industry) हिंदी इंडस्ट्रीतही सुपरहिट सिनेमे देणारे हरहुन्नरी अभिनेते सचिन पिळगांवकर (Actor Sachin Pilgaonkar). दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, गायक असलेल्या सचिन पिळगांवकरांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक सुपरडुपर हिट सिनेमे दिले. त्यातलाच एक 'अशी ही बनवा बनवी' (Ashi Hi Banwa Banwi). कित्येक वर्ष मराठी सिनेसृष्टी गाजवणारा कल्ट सिनेमा म्हणजे, 'अशी ही बनवा बनवी' (Ashi Hi Banwa Banwi Movie) . याच सिनेमामुळे मराठी इंडस्ट्री गाजवणारं त्रिकुट एकत्र आलं आणि पुढे एकापेक्षा एक सिनेमे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी रिलीज करण्यात आले. 

Continues below advertisement

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना सचिन पिळगांवकर यांनी अशोक सराफ (Ashok Saraf), लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्यासोबतच्या मैत्रीवर भाष्य केलेलं. त्यासोबत सचिन पिळगांवकरांचा गाजलेला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमामध्ये त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांना घ्यायचं होतं, पण त्यावेळी लक्ष्यानं स्पष्ट नकार दिल्याचंही सचिन पिळगांवकर म्हणाले. 

सचिन पिळगांवकरांनी सांगितलं की, "लक्ष्याला मी खूप मिस करतो. 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला. तो 2004 मध्येच मी बनवला होता. जानेवारी 2005 मध्ये तो थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटात मला त्याला घ्यायचं होतं. पण त्याच्या तब्येतीमुळे मी नाही घेऊ शकलो... त्याने स्वत:च मला नकार दिला होता. "तू म्हणतोयस, त्याचा मला आनंद आहे. पण मला डॉक्टरांनी परवानगी दिली नाही", असं तो म्हणाला होता. त्यामुळे तो त्या चित्रपटात नव्हता. दुर्दैवानं डिसेंबर 2004 मध्येच तो आपल्याला सोडून गेला. फक्त मीच नाही तर प्रेक्षक आणि संपूर्ण इंडस्ट्री त्याला मिस करते. पण माझं त्याला मिस करणं हे फक्त इंडस्ट्रीला मर्यादित ठेवून नाही. माझ्या वैयक्तिक जीवनातसुद्धा मी त्याला मिस करतो..." 

Continues below advertisement

'अशी ही बनवाबनवी'ची स्क्रिप्ट मी लिहिली : सचिन पिळगांवकर 

"अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट बनवताना एक कल्पना आली होती की, "भट्ट जमली आहे बॉस." त्यात मोजून तीन डायलॉग सेटवर बोलले गेले असतील. बाकी सगळे डायलॉग स्क्रीप्टमध्ये लिहिले होते. वसंत सबनीस आणि मी एकत्र बसून ती स्क्रीप्ट लिहिली होती. "धनंजय माने इथेच राहतात का?", हा डायलॉग स्क्रीप्टमध्ये लिहिलेला होता. मी वसंत सबनीसांना करून दाखवलं होतं की मला कसा पाहिजे? हे जागेवर सुचलेलं नाही. हे ठरवून केलेलं आहे. "हा माझा बायको पार्वती" हा अशोकचा डायलॉग, "सारखं सारखं काय त्याच झाडावर" हा माझ्या तोंडी असलेला डायलॉग आणि "जाऊबाई, नका ओ जाऊ..." हा लक्ष्याचा डायलॉग तिथे आपसूकच म्हटले गेले होते. बाकी सगळे डायलॉग स्क्रीप्टमध्ये आधीपासूनच लिहिलेले होते.", असं सचिन पिळगांवकर म्हणाले आहेत. 

दरम्यान, 'अशी ही बनवा बनवी' सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, अशोक सराफ आणि सुशांत रे या चौघांनी धम्माल उडवली होती. याव्यतिरिक्त निवेदिता जोशी-सराफ, अश्विनी भावे, सुप्रिया पिळगांवकर यांसारख्या अभिनेत्रीही झळकल्या होत्या. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'अशी ही बनवाबनवी' सिनेमाची स्क्रिप्ट लिहण्यात माझा महत्त्वाचा वाटा, '70 रुपये वारले' डायलॉग कोणी लिहिला? सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा