Sunita Ahuja On Drinking Alcohol: अभिनेता गोविंदा (Actor Govinda) यांची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) नुकतीच 'लाफ्टर शेफ्स 3' (Laughter Chefs Season 3) मध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिचा स्पष्टवक्तेपणा आणि बिनधास्त अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र, गोविंदाच्या (Govinda) 'गोळी कांड' प्रकरणावर तिनं केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुनीता आहुजा तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. त्यामुळे तिचं कोणतंही पॉडकास्ट किंवा मुलाखत व्हायरल झाली की, त्याची चर्चा बराच काळ रंगलेली दिसते. अशाच एका व्हिडीओमध्ये तिनं आपल्या घरातील आवडती जागा 'दारू पिण्याची' असल्याचं सांगितलं होतं. तसेच, ती मद्यपानही करते आणि पूजा-पाठही करते, असंही तिनं स्पष्टपणे म्हटलं होतं. याच मुद्द्यावर एका पॉडकास्टमध्ये तिला प्रश्न विचारण्यात आला असता, सुनीतानं आपल्या खास शैलीत तिला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.
दारू पिण्याच्या प्रश्नावर भडकलेली सुनीता अहुजा
2025 मध्ये ज्यावेळी सुनीता अहुजा अभिषेक व्यासच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला मद्यपानाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सुनीता आहुजा संतापली आणि तिनं आपल्या खास बिनधास्त शैलीत उत्तर दिलं की, "मी कुणाच्या बापाच्या पैशांनी दारू पित नाही. मी काही साधू-संत नाही की, कमंडल घेऊन बसू...", असं स्पष्ट शब्दांत तिनं म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती.
दारू पिण्याबाबत नेमकं काय म्हणाली?
सुनीता आहुजाला एका पॉडकास्टमध्ये तिच्या व्हायरल व्हिडीओबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्या व्हिडीओमध्ये तिनं घरातील आवडती जागा 'दारू पिण्याची' असल्याचं म्हटलं होतं. यावरून तिला, "पूजा-पाठही करता आणि दारूही पिता?", असा प्रश्न विचारण्यात आलेला. त्यावर सुनीता आहुजानं आपल्या खास बिनधास्त शैलीत उत्तर देत म्हटले होतं की, "हो, मग काय झालं? मी कुणाच्या बापाच्या पैशांनी थोडीच दारू पिते. बघा, आयुष्य बॅलन्स ठेवायला हवं. मी काही साधूसंतांचा अवतार घेतलेला नाही. मीसुद्धा एक सामान्य माणूस आहे. माझा नवरा आहे, मुलं आहेत. पूजा-पाठ करते म्हणजे, मी साध्वी झाले असा अर्थ होत नाही... कमंडल घेऊन बसायचं का? नाही भाऊ, मी आयुष्य संतुलित पद्धतीनं जगते..."
ट्रोलिंगवर सुनीता आहुजा म्हणाली की, "लोक काय म्हणतात त्याने मला फरक पडत नाही. मला कोणी जेवायला घालत नाही किंवा कोणी प्यायला पैसे देत नाही. मला आवडेल तसे जगते. डॉक्टरही म्हणतात की, दोन पेग हृदयासाठी चांगले असतात..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
