Sarke Chunar Song Controversy Nora Fatehi Apologize: कन्नड सिनेमातील (Kannada Cinema) 'केडी: द डेविल' (KD: The Devil) मधील 'सरके चुनर' (Sarke Chunar) या गाण्यावरून मोठी कॉन्ट्रोवर्सी झालेली. याच प्रकरणावर राष्ट्रीय महिला आयोगात (National Commission for Women) गुरुवारी सुनावणी पार पडली. यावेळी 'सरके चुनर' गाण्यात झळकलेली अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) आयोगासमोर हजर झाली. कॉन्ट्रोवर्सी झालेल्या 'सरके चुनर' या आयटम सॉन्गबाबत (Sarke Chunar Item Song) तिनं अखेर निवडणूक आयोगासमोर लेखी माफी मागितली आहे. तसेच, यापुढे आयटम सॉन्ग करणार नाही, असंही नोरानं स्पष्ट केलं आहे.
नोरा फतेहीनं या गाण्यामुळे निर्माण झालेल्या कॉन्ट्रोवर्सीवर दिलगिरी व्यक्त करत सांगितलं की, पुढे ती अशा कोणत्याही गाण्यावर परफॉर्म करणार नाही, ज्यामुळे समाजात महिलांविषयी चुकीचा संदेश जाईल.
नोरा फतेही अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार (Nora Fatehi Will Bear Cost Of Educating Orphaned Children)
राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना नोरा फतेही हिनं सांगितलं की, तिनं आयोगासमोर लेखी माफी सादर केली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असंही तिनं स्पष्ट केलं आहे. तसेच, काही अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवल्याचंही तिनं सांगितलं आहे.
या प्रकरणात 27 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान अभिनेता संजय दत्त राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर झाला होता. वादग्रस्त आणि अश्लील गाण्याबाबत स्पष्टीकरण देताना त्यानंही माफी मागितली होती. तसेच, 50 आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचं प्रतिज्ञापत्रही त्यानं आयोगाला सादर केलेलं.
संजय दत्तनं स्पष्टीकरण देताना सांगितलेलं की, चित्रिकरणा वेळी हे गाणं कन्नड भाषेत होतं आणि हिंदी डबिंगबाबत त्यांना कोणतीही माहिती नव्हती. त्या सुनावणीला अभिनेत्री नोरा फतेही उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.
आयोगानं स्वतःहून घेतली दखल
वादग्रस्त गाण्यातील कथित अश्लीलता आणि आक्षेपार्ह गीतांमुळे राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली होती. या संदर्भात संजय दत्त आणि नोरा फतेही यांना नोटीस बजावण्यात आली होती. यापूर्वी 6 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान नोरा फतेहीच्या वतीनं तिचे वकील उपस्थित राहिले होते. मात्र, आयोगानं ते मान्य करण्यास नकार देत अभिनेत्रीला 27 एप्रिलच्या सुनावणीला स्वतः उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते.
सुनावणीदरम्यान आयोगाच्या अध्यक्षा विजया के. रहाटकर यांनी गाण्याच्या बोलांवर गंभीर आक्षेप नोंदवला होता. "अशा प्रकारची गाणी महिलांच्या सन्मानाविरोधात आहेत. सर्जनशीलतेच्या नावाखाली महिलांच्या प्रतिष्ठेशी तडजोड केली जाऊ शकत नाही...", असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं.
आयोगाच्या कठोर भूमिकेनंतरही 27 एप्रिल रोजी अभिनेत्री नोरा फतेही सुनावणीसाठी हजर राहिली नव्हती. या प्रकरणात गीतकार रकीब आलम, दिग्दर्शक प्रेम तसेच निर्मिती संस्थेचे प्रतिनिधी आयोगासमोर उपस्थित झाले होते. तिनं लेखी माफीनामा सादर करत या गाण्याचा समाजावर नकारात्मक परिणाम झाल्याची कबुली दिली. तसेच, भविष्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्याचे आश्वासनही त्यांनी दिलंय.
दरम्यान, वादग्रस्त गाणं 'केडी: द डेविल' या कन्नड सिनेमाचा भाग आहे. प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती. वाढत्या विरोधानंतर हे गाणं युट्यूबवरून हटवण्यात आलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
