Sunita Ahuja Rejects Divorce With Govinda: गेल्या काही दिवसांपासून सुनीता आहुजानं (Sunita Ahuja) बॉलिवूड (Bollywood News) सुपरस्टार गोविंदाविरुद्ध (Actor Govinda) घटस्फोटाची (Divorce) याचिका दाखल केली आहे. पण आज, गणेश चतुर्थी एकत्र साजरी करून, गोविंदा आणि सुनीता यांनी घटस्फोटाच्या (Govinda And Sunita Ahuja Divorced) अफवांना पूर्णविराम दिला आहे. दोघांनीही एकत्र गणपती बाप्पाची पूजा केली आणि माध्यमांना मिठाई वाटतानाही दिसले. अशातच घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता सुनीता अहुजा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसेच, स्पष्टीकरण देत गोविंदाच्या पत्नीनं घटस्फोटाच्या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. 

सुनीता आहुजानं एएनआयशी बोलताना गोविंदापासून घटस्फोट घेण्याबाबतच्या चर्चांबाबत सांगितलं. ती म्हणाली की, "आज आम्ही एवढे जवळ होतो. तुम्ही म्हणताय तसं काही असतं, तर आम्ही एवढे जवळ असतो का? आमच्या दुरावा असता. कोणीच आम्हा दोघांना वेगळं करू शकत नाही, मग वरुन साक्षात देव जरी आला किंवा अगदी शैतानही आला तरीसुद्धा आम्हाला कुणीच वेगळं करू शकत नाही. कुणीच वेगळं करू शकत नाही..." 

'मेरा गोविंदा सिर्फ मेरा ही है...'

सुनिता अहुजा पुढे बोलताना म्हणाल्या की, "एक सिनेमा होता ना... 'मेरा पति सिर्फ मेरा है...' अगदी तसंच, 'मेरा गोविंदा सिर्फ मेरा ही है...' और किसा का नही. जोपर्यंत आम्ही तोंड उघडणार नाही, तोपर्यंत तुम्ही कुणालाच काही बोलू नका..." 

गोविंदा नेमकं काय म्हणालेला? 

यापूर्वी, माध्यमांशी बोलताना, गोविंदानं असंही म्हटलं होतं की, तो नेहमीच एकत्र राहण्याची प्रार्थना करतो. तो म्हणाला होता की, "ज्यांच्यावर सर्वात आधी भगवान गणेशाचा आशीर्वाद असतो, त्याच्या कुटुंबातील संकटं दूर होतात, दुःख आणि अडथळे दूर होतात आणि समाजासोबत एकत्र राहू शकतो. आम्ही एकत्र राहावं अशी प्रार्थना करतो. आम्ही एकत्र राहावं यासाठी तुमच्या शुभेच्छा आहेतच..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

सगळीकडे घटस्फोटाची चर्चा असताना मॅनेजरचे शब्द खरे ठरले, गोविंदा अन् सुनीता आहुजा गणेशोत्सवासाठी एकत्र