Govinda with his wife Sunita welcome at their home Ganesh Chaturthi Ganesh Utsav : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा आणि सुनीत आहुजा यांचा घटस्फोटो होणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, गणेश चतुर्थीच्या विशेष (बुधवारी, दि.27) प्रसंगी गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता हे दोघेही एकत्र माध्यमांसमोर आले. या वेळी दोघांनी सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.  तसेच टीना आणि यश या त्यांच्या मुलांसाठी लोकांकडून आशीर्वादही मागितले. गोविंदाच्या मॅनेजरने काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवासाठी दोघं एकत्र दिसतील, असं म्हटलं होतं. त्यामुळे मॅनेजरचे शब्द खरे ठरले आहेत, असं बोललं जातं आहे. 

Continues below advertisement

“आपण सारे एकत्र राहू” – गोविंदा

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने माध्यमांशी बोलताना गोविंदा म्हणाला, “यापेक्षा खास असं काहीच असू शकत नाही. जेव्हा बाप्पाचं आशीर्वाद लाभतं तेव्हा कुटुंबातील सगळ्या अडचणी दूर होतात आणि दुःख नष्ट होतं. आम्ही प्रार्थना करतो की आपण सगळे मिळून शांततेत जीवन व्यतीत करावं. आपण सारे असेच एकत्र राहू.”

मुलांसाठी घेतला आशीर्वाद

या खास प्रसंगी गोविंदांनी आपल्या मुलांचा – टीना आणि यशचा उल्लेख केला. ते म्हणाले, “मी विशेषत: तुमचा आशीर्वाद यश आणि टीनासाठी मागतो. तुम्ही सगळे त्यांना साथ द्या आणि आधार द्या. मी बाप्पाकडे त्यांच्या यशासाठी प्रार्थना करतो. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांचं नाव माझ्याहूनही मोठं करो आणि लोक आश्चर्यचकित होतील की गोविंदाची मुलं कुठल्याही बाहेरच्या मदतीशिवाय एवढं मोठं यश मिळवू शकली.”

Continues below advertisement

घटस्फोटाच्या अफवांवर दिला नाही प्रतिसाद

या दरम्यान थेट काही न बोलता, पण जेव्हा त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांबद्दल विचारण्यात आलं तेव्हा दोघांपैकी कुणीही उत्तर दिलं नाही. मात्र गोविंदा आणि सुनीता यांना कॉन्ट्रोव्हर्सीबाबत विचारलं असता सुनीता म्हणाल्या, “तुम्ही इथे कॉन्ट्रोव्हर्सी ऐकायला आलात का की ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणायला आलात?”

 

 

इतर महत्त्त्वाच्या बातम्या 

70 मिनिटांनंतर सिनेमाची स्टोरी एकदम पलटते, चक्रावून टाकणारा थ्रिलर सिनेमा, भारतात नंबर 1 वर ट्रेंड करतोय सिनेमा

Well Done Aai Upcoming Marathi Movie: प्रेमळ पण कणखर आईची कहाणी सांगणाऱ्या 'वेल डन आई' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित; विशाखा सुभेदार मुख्य भूमिकेत