Sunil Shetty on Border song : अभिनेता सनी देओल आणि सुनील शेट्टी यांचा 'बॉर्डर' हा सिनेमा 1997 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. जे. पी. दत्ता दिग्दर्शित आणि सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ, आणि ताबू यांच्या दमदार अभिनयाने हा सिनेमा हिट ठरला होता. हा चित्रपट 1971 साली भारत आणि पाकिस्तान या दोन देशात झालेल्या युद्धावर आधारित आहे. हा सिनेमा केवळ युद्धपट नव्हता, तर देशभक्ती, त्याग, आणि सैनिकांच्या भावनिक जीवनाचं अत्यंत प्रभावी चित्रण करणारा एक दस्तावेज ठरला.
या सिनेमातील To Chalun हे सुनील शेट्टीचं गाणं तुफान गाजलं होतं. नुकतंच लग्न झालेलं असताना सुनील शेट्टी बॉर्डरवर जाणार असतो. या सीनवर आधारीत हे गाणं आहे. दरम्यान, याचं गाण्याबाबत अभिनेता सुनील शेट्टी याने भाष्य केलंय.
सुनील शेट्टी म्हणाला, बॉर्डरमधील मधुचंद्राच्या सीनवेळी मला टेन्शन यायचं. कसं शूट करणार? काय करायचं?..आम्ही मध्येच एक सीन शूट करताना अडखळलो होतो. जर जवान बाहेर सोडत असेल तर तो प्रेमाला कशा पद्धतीने सोडेन? आम्ही संभ्रम अवस्थेत होतो. जे. पी. दत्ता सर आमच्याशी बोलत होते. मग त्यांनी साऊंड टाकला. मी वरती बघतो आणि विमानं लक्षात आणून देतात की, युद्ध सुरु झालंय. या सर्वांपेक्षा देश महत्त्वाचा आहे. मग मी ओरडतो..कंपनी... त्यानंतर मी मागे वळून न पाहाता..इतर जवानांसोबत रवाना होतो.
बॉर्डर या सिनेमात सनी देओलने 'मेजर कुलदीप सिंग चांदपुरी' यांची भूमिका साकारली असून, ती त्याच्या अभिनय कारकिर्दीतील एक मैलाचा दगड मानली जाते. सनी देओलने धडाकेबाज अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात त्यांच्या पात्राचा एक अढळ ठसा उमटतो. विशेषतः "हम मरते दम तक लड़ेंगे…" सारखे संवाद प्रेक्षकांच्या काळजाला भिडतात. त्यांच्या कणखर व्यक्तिमत्त्वामुळे युद्धातील गंभीरता आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची भावना समोर येते.
'बॉर्डर' चित्रपटात युद्धाचे दृश्य जितके वास्तववादी आहेत, तितकीच हळवी बाजूही यामध्ये आहे. सैनिकांच्या कुटुंबीयांची ओढ, त्यांची चिंता, आणि अनिश्चितता हे सगळं प्रेक्षकाला भावनिकतेच्या गुंफण्यात गुंतवतं. सनी देओलचा अभिनय केवळ एक वीर योद्धा म्हणून नव्हे तर एक जबाबदार नेता, एक संवेदनशील मित्र आणि एक प्रेमळ माणूस म्हणूनही समोर येतो.
चित्रपटातील संगीत, विशेषतः 'संदेसे आते हैं', 'तो चले' आणि 'मेरे दुश्मन मेरे भाई' या गाण्यांनी देशभरात देशभक्तीची लहर पसरवली. या गाण्यांमध्ये सनी देओलचा भावनिक अभिनयही प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू आणतो. युद्धपट असला तरी 'बॉर्डर'ने माणुसकी, एकता, आणि शांतीचा संदेशदेखील दिला आहे.
'बॉर्डर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपार यश मिळवलं आणि प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. हा चित्रपट केवळ एक करमणुकीचा सिनेमा नसून तो एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. सनी देओल यांच्या प्रभावी अभिनयामुळे आणि जे. पी. दत्ताच्या जबरदस्त दिग्दर्शनामुळे 'बॉर्डर' आजही युद्धपटांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Saiyaara ची 200 कोटींची कमाई, Gen Z चा थिएटरमध्ये धुमाकूळ, आता चालू वर्षातील फक्त एक सिनेमा पुढे