Suniel Shetty Reveal Reason Of Rejecting South Movies: बॉलिवूडचा (Bollywood News) फिट अँड फाईन हँडसम हंक म्हणजे, सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि चाहत्यांचा लाडका सुनील अण्णा. सुनील शेट्टीनं अलिकडेच खुलासा केलाय की, तो स्वतः साऊथचा असूनही तो बहुतेकदा बॉलिवूडमध्ये काम करतो आणि साऊथच्या ऑफर्स नाकारतो... तसेच, त्यानं बोलताना हेसुद्धा स्पष्ट केलंय की, त्याला अनेक साऊथ सिनेमांच्या (South Movies) ऑफर्स येतात, पण तो त्या साईन करत नाही, कारण बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) बहुतेकदा साऊथ सिनेमांमध्ये व्हिलनच्या भूमिकेत दिसतात. 

Continues below advertisement


सुनील शेट्ट साऊथ सिनेमांच्या ऑफर्स का नाकारतो? (Sunil Shetty Reject Offers From South Films?)


सुनील शेट्टीनं 'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हटलेलं की, "मला ऑफर्स (साऊथ फिल्म्सच्या) येतात, पण दुर्दैवानं, तिथे आपल्याला निगेटिव्ह रोल्स मिळाल्याचा ट्रेंड दिसतो... ते हिंदी हिरोंना खूपच बलवान म्हणून सर्वांसमोर आणू इच्छितात... खलनायकाच्या दृष्टिकोनातून, (ते म्हणतात) ते पडद्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी चांगलं आहे... पण ही एक गोष्ट मला आवडत नाही..." 


"मी रजनी सरांसोबत एक चित्रपट करत होतो, कारण मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी. अलिकडेच, मी एका चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी एक छोटीशी 'टुकू' फिल्म केली, जी खरोखर चांगली चालली. त्याचे नाव 'जय' आहे." तो 'जय' मध्ये एका छोट्या भूमिकेत दिसला. ते पुढे म्हणाले, "आज भाषेचा कोणताही अडथळा नाही. जर काही अडथळा असेल, तर तो कदाचित त्यातील साहित्यामुळे असेल... जर तुमचा मजकूर चांगला असेल, तर तो सर्व अडथळ्यांवर मात करेल..."


सुनील शेट्टीच्या वर्कफ्रंटबाबत थोडसं... 


सुनील शेट्टी लवकरच 'इंडियाज सुपर फाउंडर्स'मध्ये दिसणार आहे. Amazon MX Playerनं 'इंडियाज सुपर फाउंडर्स'ची घोषणा केली, ही एक हाय स्टेक एंटरप्रेन्योरल रियलिटी सीरीज़ आहे, जी भारताच्या स्टार्टअप कथेला पडद्यावर जिवंत करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. Amazon MX Player वर मोफत स्ट्रीमिंग करून, हा शो भारतातील सर्वात फाउंडर्स एकत्र आणतो. या सीरिजचं अँकरिंग सुनील शेट्टी करणार आहे. सुनील शेट्टी यांनी या शोचं वर्णन 'कल को शेप करने के लिए चेंजमेकर्स' साजरं करणारं व्यासपीठ म्हणून केलंय. सुनील शेट्टीच्या आगामी सिनेमांबाबत बोलायचं झालं तर, सुनील शेट्टी 'हेरा फेरी 3' आणि 'वेलकम टू द जंगल'मध्ये दिसणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'माझा होणारा नवरा कुणाच्या DM मध्ये सुहागरात करत असेल तर...'; पलाश मुच्छलच्या फ्लर्टी चॅट्सवरुन RJ महावशचे टोमणे