RJ Mahavash On Smriti Mandhana Palash Muchhal Wedding: टीम इंडियाची (Team India) स्टार खेळाडू स्मृती मानधना (Smriti Mandhana) गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नसोहळ्यामुळे चर्चेत आहे. स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना धुमधडाक्यात सुरुवात झाली, पण लग्नाच्या आदल्या रात्री काही घडामोडी घडल्या आणि अचानक स्मृती आणि पलाश मुच्छलचं (Palash Muchhal) लग्न पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलं. सुरुवातीला स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे लग्न पुढे ढकलल्याचं बोललं गेलं. पण, त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या तर्क-वितर्कांना उधाण आलं. त्यातच पलाश मुच्छलचे फ्लर्टी चॅट्स (Palash Muchhal Viral Chats) सोशल मीडियावर व्हायरल झाले. एवढंच नाहीतर, पलाशनं फसवल्यामुळे स्मृतीनंच लग्न मोडल्याचा दावाही केला जातोय. अशातच आता या प्रकरणावरुन कथित गर्लफ्रेंड आरजे महावशची (RJ Mahavash) एन्ट्री झाल्याचं दिसतंय.
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युझवेंद्र चहलची कथित गर्लफ्रेंड आरजे महावशनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. आरजे महावशचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आरजे महावशनं काहीशा खोचक अंदाजात पलाशच्या फ्लर्टी चॅटवरुन एक व्हिडीओ केलाय, जो सध्या व्हायरल होतोय. आरजे महावशनं स्वतःच्या लग्नाचा संबंध थेट पलाशच्या फसवणुकीसोबत जोडला असून मला वाचवा मित्रांनो... अशी विनवणीही केली आहे. जर माझ्या बॉयफ्रेंडनं कुठल्या तरुणीला मेसेज पाठवले, तर त्याचे स्क्रिनशॉर्ट्स व्हायरल करा..., असं आवाहनही आरजे महावशनं केलंय.
VIDEO मध्ये आरजे महावशनं काय म्हटलंय? (RJ Mahavash On Palash Muchhal Viral Chats)
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये आरजे महावश म्हणाली की, "पुरुष मंडळी खूप प्रेमळ असतात. जेव्हा विचारू तेव्हा ते सिंगलच असतात. मला खरंखोटं माहीत नाही. पण माझ्या लग्नावेळी मी माझ्या नवऱ्याला एक आठवडा आधी इंटरनेटवर शेअर करणार नाही. तसेच, माझा बॉयफ्रेंड जर कुणाच्या मेसेज बॉक्समध्ये सुहागरात साजरी करत असेल, तर प्लिज मला येऊन सांगा... आता लग्न होतंय, ही कशी शोधेल, ही त्याच्यावर विश्वास ठेवत असेल, असं तुम्हाला वाटेल. पण नाही, मी या जगात कुणावरही विश्वास ठेवत नाही... हा मुलगा कुणासाठी काही करू शकत नाही, असं मी कुणाबाबत म्हणू शकत नाही. कुणीही काहीही करू शकतं. गरज पडल्यास तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट शेअर करा. किंवा मला वैयक्तिक मेजेस करा... मी ते शेअर करेन. कदाचित मी ते जाहीर करणारही नाही. मात्र मी केवळ नात्यामधून शांतपणे जाऊ इच्छिते. मित्रांनो मला वाचवा..." आरजे महावशच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.
पलाश मुच्छलचं अफेअर?
सोशल मीडियावर काही चॅट्सचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये पलाश एका कोरिओग्राफरसोबत फ्लर्टी चॅट्स करताना दिसतोय. पलाशची बहीण सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छल हिनं एक छोटीशी पोस्ट शेअर करून सर्व अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. ज्यामध्ये असं म्हटलंय की, लग्न केवळ वधूच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे पुढे ढकलण्यात आलंय. दरम्यान, स्मृती किंवा पलाश या दोघांनीही अद्याप या विषयावर भाष्य केलेलं नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :