Sulakshana Pandit Love Story: सुप्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री (Actress) सुलक्षणा पंडित (Sulakshana Pandit) यांचं निधन झालंय. सुलक्षणा पंडित म्हणजे, अभिनेत्री विजेता पंडित (Vijayta Pandit) आणि संगीतकार (Music Composer) जोडी जतिन-ललित (Jatin-Lalit) यांची बहीण. सुलक्षणा पंडित यांची ओळख फक्त गायिका म्हणूनच नाहीतर, त्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीही होत्या. सुलक्षणा पंडीत (Sulakshana Pandit Passes Away) यांनी 6 नोव्हेंबरला अखेरचा श्वास घेतला, तर तब्बल 40 वर्षांपूर्वी याच तारखेला दिग्गज अभिनेते संजीव कुमार (Sanjiv Kumar) यांचंही निधन झालेलं. आता तुम्ही म्हणाल याचा काय संबंध? संबंध आहे तो एका अधुऱ्या राहिलेल्या प्रेमकहाणीचा... पण, योगायोग पाहा, दिग्गज अभिनेत्री, गायिका ज्याच्यावर भाळली, त्याच्याच पुण्यातिथीच्या दिवशी जगाचा निरोप घेतला.
सुप्रसिद्ध अभिनेत्री, गायिका सुलक्षणा पंडित यांनी जगाचा निरोप घेतलाय. 6 नोव्हेंबर रोजी त्यांचं निधन झालं. त्यांचे भाऊ म्हणजे, संगीत दिग्दर्शक ललित पंडित यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केलीय. सुलक्षणा आयुष्यभर अविवाहित राहिल्या. अधुऱ्या प्रेम कहाणीमुळे, त्या इतक्या दुखावल्या गेल्या की, त्या इतर कुणाचा विचारच करू शकल्या नाहीत. दरम्यान, योगायोग असा घडला की, ज्याच्यावर आयुष्यभर प्रेम करत राहिल्या त्याच्याच पुण्यतिथीच्या दिवशी अखेरचा श्वास घेतला. आम्ही ज्या अभिनेत्याच्या पुण्यातिथीबाबच बोलत आहोत, त्या अभिनेत्याचं नाव संजीव कुमार.
संजीव कुमार यांचं आजच्याच दिवशी 40 वर्षांपूर्वी झालेलं निधन
लोकप्रिय अभिनेते संजीव कुमार यांनी 6 नोव्हेंबर 1985 रोजी या जगाचा निरोप घेतला. चाळीस वर्षांनंतर, याच तारखेला सुलक्षणा पंडित यांचं निधन झालंय. दरम्यान, सुलक्षणा यांनी आपला पहिला सिनेमा संजीव कुमार यांच्यासोबत केला आणि त्याच सिनेमात त्या संजीव कुमार यांच्यावर भाळल्या. सुलक्षणा यांनी आपल्या प्रेमाची कबुली थेट संजीव कुमार यांच्यासमोरच दिलेली, पण संजीव यांनी मात्र त्यांच्या प्रेमाचा प्रस्ताव नाकारला. तेव्हापासूनच सुलक्षणा त्यांच्या एकंदरीत आयुष्याबाबतच निराश झालेल्या. त्यांची निराशा एवढी टोकाला पोहोचलेली की, त्यांच्या करिअरची किंवा आयुष्याची त्यांना काहीच जाणीव उरली नव्हती. त्या नैराश्यानं ग्रस्त झालेल्या आणि एकांतवासात गेल्या. पण, शेवटपर्यंत त्यांचं हृदय फक्त आणि फक्त संजीव कुमार यांच्यासाठी धडधडत होतं.
डेब्यू फिल्ममध्येच संजीव कुमार यांच्यावर भाळल्या...
सुलक्षणा पंडित 70 आणि 80 च्या दशकातली सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री. जणू सौंदर्याची खाण, जिच्यावर कित्येकांचा जीव भाळला होता. त्यांचे रेखीव डोळे, काळजाच चर्र होईल, असं स्मित हास्य, जो त्यांच्याकडे पाहिल, त्याची नजर हटणारच नाही... पण, जिच्यावर प्रत्येकजण फिदा होता, तिचं हृदय मात्र फक्त आणि फक्त संजीव कपूर यांच्यासाठीच धडधडत होतं. पण कुणाला माहीत होतं की, नेहमीच चेहऱ्यावर हसू घेऊन वावरणारी अभिनेत्री एक दिवस एकांतातच जगाचा निरोप घेईल...
1975 मध्ये आलेल्या 'उलझन' या चित्रपटातून सुलक्षणा यांनी पदार्पण केलेलं. या चित्रपटात त्यांनी संजीव कुमार यांच्यासोबत काम केलं. गंभीर स्वभावाच्या संजीव यांना पाहून सुलक्षणा त्यांच्या प्रेमात पडल्या. त्यावेळी संजीव कुमार हेमा मालिनी यांच्या प्रेमात होते, पण तरीही सुलक्षणा त्यांच्या प्रेमात पडल्या.
संजीव कुमार यांनी नाकारला प्रेमाचा प्रस्ताव
सुलक्षणा संजीव कुमार यांच्या प्रेमात पडल्या. दरम्यान, संजीव कुमार यांनी हेमा मालिनी यांना प्रपोज केलेलं. पण, डिम गर्लनं संजीव कुमार यांचं प्रपोजल नाकारलं, कारण हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्यावर प्रेम करत होती. हेमाच्या नकारामुळे संजीव कुमार यांचं मन दुखावलं. तोपर्यंत, ते आणि सुलक्षणा खूप चांगले मित्र झाले होते आणि ते सुलक्षणा यांच्याशी सर्वकाही शेअर करायचे. जेव्हा संजीव कुमार हेमा मालिनी यांच्यापासून वेगळे झाले, तेव्हा सुलक्षणा यांनी स्वतः संजीव कुमार यांच्यासमोर प्रेम व्यक्त केलं, पण नियतीनं वेगळी योजना आखलेली. हेमाच्या नकारानंतर, त्यांनी सुलक्षणा यांनाही नाकारलं. संजीव कुमार यांच्या नकारामुळे सुलक्षणा यांना खूप धक्का बसला, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं. त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणं थांबवलं आणि बाहेरील जगाशी असलेले सर्व संबंध तोडले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :