Horoscope Today 7 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 7 नोव्हेंबर 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज शिस्त नियोजन आणि ठराविक लोकांबरोबरची बैठक यांच्यामुळे आजचा दिवस लाभदायक करून टाकाल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज भाग्याची साथ मिळेल, परंतु मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींमुळे तापटपणा वाढू शकतो
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज पित्त विकार आणि रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी औषधे टाळू नयेत
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज जोडीदाराच्या दुटप्पी वागण्याचा त्रास होईल, नोकरीमध्ये किती काम केले तरी वरिष्ठांची मर्जी न झाल्यामुळे मानसिक त्रास होईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज कोणत्याही गुप्त गोष्टी करताना काळजी घ्यावी लागेल, महिला लहरी बनतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज कोणत्याही सामाजिक घडामोडींचा परिणाम घरावर होऊ देणार नाही, त्यामुळे घरामध्ये जास्तीत जास्त मौन पाळाल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल, कमिशन एजन्सीचा व्यवसाय करणाऱ्यांना आपल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज गाठीभेटी आणि संपर्क या माध्यमातून कामाची गती वाढेल, भरपूर कष्ट करावे लागले तरी लाभ मिळेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज पैसा मिळाला तरी नको तिथे खर्च झाल्यामुळे हातात काही उरणार नाही, महिलांना काही ठोस निर्णय सगळीकडे घ्यावे लागतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज थोडेसे मितवासी आणि वेळेचा सदुपयोग करून घेण्याची कला वापरा, या गुणांचा आज चांगलाच उपयोग होईल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज घरच्या आघाडीवर थोडे सांभाळूनच राहायला लागणार आहे, तुम्ही घेतलेले निर्णय घरातील लोकांना पटणार नाही
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज गुप्त शत्रूंचा त्रास जरा जास्त जाणवेल, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सावधानता बाळगावी लागेल.
हेही वाचा
Angarak Yog: पुन्हा मोठं संकट? 7 डिसेंबरपर्यंत 'या' 3 राशींनो ताकही फुंकून प्याल, मंगळ - राहूचा अंगारक योग, ज्योतिषींचा सावधानतेचा इशारा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)