Sukanya Mone : 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून घराघरात पोहचलेली चिमुकली परी म्हणजेच मायरा वायकुळ (Myra Vaikul) ही मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नाच गं घुमा या सिनेमातून मायराने सिनेमात पदार्पण केलं. त्यानिमित्ताने मायराने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. पण या मुलाखतीदरम्यान तिच्या बोलण्यामुळे मायराच्या आईवडिलांना बरंच ट्रोल करण्यात आलं. यावर सुकन्या मोने (Sukanya Mone) यांनी दिलेल्या उत्तराने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलंय. 


नाच गं घुमा या सिनेमात मायरा ही सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे मुक्ता बर्वे यांसारख्या नायिकांसोबत दिसत आहे. मुक्ता बर्वे हिच्या लेकीची भूमिका मायराने साकारली आहे. तिच्या या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केल्याचं पाहायला मिळालं आहे. पण तिचं बोलणं हे अगदी मोठ्या माणसांप्रमाणे असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यातच तिच्या आईवडिलांमुळे तिचं लहानपण हरवलं असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 


तिच्या आईचं विशेष कौतुक वाटतं - सुकन्या मोने


मायरासोबत माझी खूप छान मैत्री झाली. आपल्याला नेहमी वाटतं की लहान मुलं खूप आगाऊ असतात, आईवडिल त्यांचे खूप लाड करतात. पण तशी ती अजिबात नाहीये. त्यामुळे मला तिचं आणि तिच्या आईवडिलांचं खरंच खूप कौतुक वाटतं.त्यांनी तिला खूप चांगलं वाढवलं आहे. तिच्या हातात कधीच तुम्हाला फोन दिसणार नाही. ते तिची नेहमी खेळणी घेऊन येतात. मग आम्ही सेटवर खूप खेळायचे. भातुकली, गेम्स वैगरे. झोपायच्या वेळी झोपायचो. असं तिला खूप छान वाढवतायत ते, असं सुकन्या मोने यांनी म्हटलं. 


मायराचे आईवडिल ट्रोल


मायराचा एका मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये मायराला विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तिने अगदी मोठ्या माणसांप्रमाणे दिली असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अवघ्या सात वर्षांच्या या चिमुकलीला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. या मुलाखतीमध्ये मायरला तिच्या भविष्यातील प्लॅन्सविषयी विचारण्यात आलं. त्यावर तिने म्हटलं की, मला माझ्या आईवडिलांचा व्यवसाय सांभाळायचा आहे. मला माहित नाही, पुढे जाऊन काय होणार, ते फक्त देवाला माहित आहे. मी सिनेमे, मालिका करणारच आहे, पण ते सगळं त्यालाच माहित मी कसं करणार आहे, असं उत्तर या अवघ्या सात वर्षांच्या चिमुकलीने दिलं. 


ही बातमी वाचा : 


Myra Vaikul: 'हिचं लहानपण हरवलंय', अवघ्या 7 वर्षांच्या चिमुकलीचं बोलणं ऐकून नेटकरी बरसले; मायरा वायकुळचे आईवडिल झाले ट्रोल