Sudha Chandrans Devotional Video: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन (Sudha Chandran) अनेक कारणांमुळे चर्चेत असते. सध्या तिचं चर्चेत असण्यामागचं कारण वेगळं आहे. अभिनेत्री सुधा चंद्रन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत सुधा चंद्रन देवीच्या भक्तीत तल्लीन झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुधा चंद्रन यांच्या घरात 'माता की चौकी' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या धार्मिक कार्यक्रमात अनेक जण उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, सुधा चंद्रन यांच्या अंगात आल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी उपस्थित असलेल्यांनी सुधा चंद्रन यांना सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना सावरणंही कठीण झालं होतं. सध्या सुधा चंद्रन यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये सुधा चंद्रन यांनी लाल आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. तसेच त्यांच्या कपाळावर 'जय माता दी' असं लिहिलेली एक पट्टी देखील दिसत आहे. त्यांनी त्यांच्या घरात 'माता की चौकी' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात परिवारासह अनेक जण उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित सर्वे जण भक्तीगीतावर तल्लीन होऊन नाचू लागले. सुधा चंद्रन यांनीही यात सहभाग घेतला. व्हायरल व्हिडिओमध्ये त्या भक्तीगीतावर नाचताना दिसत आहे. मात्र, अचानक त्यांच्या अंगात देवी आल्याचं बोललं जात आहे. दुसऱ्या व्हायरल व्हिडिओमध्ये, सुधा स्वत:ला सावरू शकत नसल्याचं दिसून येत आहे. त्या काही वेळ शुद्धीत नव्हत्या. उपस्थित लोकांनी त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुधा चंद्रन यांना सांभाळणे कठीण झाले होते.
सध्या सुधा चंद्रन यांच्या घरातील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकानं 'सुधा चंद्रन बहूतेक नागिन या मालिकेसाठी ऑडिशन देत आहे'. तर, दुसऱ्याने 'नेहमीसारखी ती ओव्हरअॅक्टिंग करत आहे', अशी कमेंट केली. तर, आणखी एका नेटकऱ्याने, 'हे खरं आहे की खोटं, की नक्की शूटिंग सुरू आहे?', असा प्रश्न विचारला. तर, आणखी एका युजरने, 'प्रत्येकाचा स्वत :चा धर्म असतो. कुणीही हसू नका. देवी माता तिच्या खऱ्या भक्तांमध्ये प्रवेश करते', अशी कमेंट केली. सध्या सुधा चंद्रन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
सुधा चंद्रन यांनी सिनेसृष्टीत मालिका तसेच चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्या फक्त अभिनेत्री नसून, उत्तम नृत्यांगनासुद्धा आहे. सध्या त्या नागिन आणि दोरी या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.