Sudha Chandran Responds to Trolls: बॉलिवूड अभिनेत्री सुधा चंद्रन अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. अभिनेत्री खास अभिनय आणि नृत्यासाठी प्रचलित आहे. परंतु, एका व्हायरल व्हिडिओमुळे त्या प्रकाशझोतात आल्या आहेत. त्यांचा एक देवीच्या पुजेच्या दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुधा चंद्रन यांच्या घरात 'माता की चौकी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भक्ती गीते सुरू असतानाच त्यांच्या अंगात आलं. काहींनी अभिनेत्रीच्या अंगात आलं असल्याचं सांगितलं. त्यांना सावरणं अनेकांना कठीण जात होतं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या व्हिडिओची काही नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली. तर, काहींनी त्यांना ट्रोल केलं. पण हा व्हिडिओ व्हायरल होताच सुधा चंद्रन यांनी नुकतंच स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी नेटकऱ्यांनी उडवलेल्या खिल्लीवर प्रत्युत्तर दिलं आहे.
काही दिवसांपूर्वी सुधा चंद्रन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या व्हिडिओत सुधा चंद्रन यांच्या अंगात आल्याचं स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. दरम्यान, नेटकऱ्यांनी सुधा चंद्रन यांची खिल्ली उडवली. यावर सुधा चंद्रन यांनी प्रतिक्रिया दिली. सुधा म्हणाल्या की, "स्वत:बाबत कुणालाही कोणतेही स्पष्टीकरण देणे गरजेचं वाटत नाही. याची मुळात गरजच वाटत नाही", अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
झुमला दिलेल्या मुलाखतीत सुधा चंद्रन म्हणाल्या की, "जीवनाबद्दल माझा एक स्वत:चा दृष्टिकोन आहे. माझे असे काही संबंध आहेत, ज्यांचा मी आदर करते. मला खरंतर लोकांशी काहीही घेणंदेणं नाही. जे माझी थट्टा करतात, ते ठीक आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात आनंदात राहावे. जे लोक प्रश्न विचारतात त्यांना उत्तर देण्यात मी बांधील नाही, आतापर्यंतचे जीवन आनंदाने, आदराने आणि देवाच्या आशीर्वादाने जगले आहे. लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, याचा मी कधीही विचार केलेला नाही. अपघात झाल्यानंतर मला बरेच जण खूप काही बोलले. पण पदरी यश पडल्यानंतर तेव्हा लोक त्यावर बोलतात".
सुधा चंद्रन यांच्या अंगात देवी आली होती
अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या घरात 'माता की चौकी ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भक्तिगीत सुरू होते. अचानक अभिनेत्रीच्या अंगात देवी येते. अचानक त्या बेशुद्ध पडल्या. अनेकांनी त्यावेळी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. अंगात देवी येण्यापूर्वी त्यांनी भजन गायले होते. तसेच नृत्य देखील सादर केले होते.