Ganesh Chaturthi 2020 | सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचं आगमन, फोटो केले शेअर Maharashtra Temple Reopen | गणपती काळात राज्यातील मंदिरं सुरु करा : ब्राह्मण महासंघ
अशी चूक पुन्हा होणार नाही! प्रवीण तरडे यांनी मागितली जाहीर माफी
सौमित्र पोटे, एबीपी माझा | 23 Aug 2020 12:38 PM (IST)
प्रविण तरडे यांनी बाप्पाची केलेली आरास ही पुस्तक बाप्पा अशा संकल्पनेवर आधारित आहे. पण त्यातून एक नवा वाद निर्माण झाला आहे.
मुंबई : घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. कोरोनामुळे सगळ्यांचं जगणं विस्कळीत झालं असलं तरी प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे बाप्पाचं स्वागत केलं आहे. अनेक कलाकारही त्याला अपवाद नाहीत. सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी, अवधूत गुप्ते, सुशांत शेलार, संदीप पाठक आदी अनेकांच्या घरी बाप्पा आले आहेत. प्रत्येकाने आपल्याला जमेल तशी आरास करून बाप्पाची पूजा केली. अनेक चित्रपटांचं लेखन केलेले आणि अनेक चित्रपटांमधून अभिनय केलेले प्रवीण तरडे यांच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यांनी बाप्पाची केलेली आरास ही पुस्तक बाप्पा अशा संकल्पनेवर आधारित आहे. पण त्यातून एक नवा वाद निर्माण झाला आहे. प्रवीण यांनी आरास करताना बाप्पाच्या दोन्ही बाजूंना आपल्या घरी असलेली पुस्तकांची सजावट केली आहे. तर काही पुस्तकं मधोमध रचून पुस्तकांवर बाप्पा ठेवला होता. त्यात त्यांनी सर्वात वर भारतीय राज्यघटना ठेवून त्यावर बाप्पा ठेवला होता. गणपती ही बुद्धीची देवता असल्यामुळे त्यांनी अशी रचना केली होती. पण त्यातून अनेकांच्या भावना दुखावल्या. भारतीय राज्यघटना ही सर्वात वर असते, त्यावर बाप्पा ठेवून प्रवीण यांनी अनेक भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत, असे निरोप प्रवीण यांच्यापर्यंत गेले. त्यांना काही संघटनांचे फोनही आले. त्यांनी या प्रकाराबाबत नाराजी नोंदवल्यानंतर प्रवीण यांनी एक नवा व्हिडिओ करून जगभरात ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची माफी मागितली आहे. प्रवीण तरडे यांनी तसा व्हिडिओ 'माझा'कडे पाठवला आहे. या नव्या व्हिडिओत ते म्हणतात, 'माझ्या घरी पुस्तक गणपती अशी संकल्पना होती. बुद्धीची देवता बाप्पा आणि बुद्धीचं मोठं प्रतीक म्हणजे भारतीय संविधान अशी यामागची संकल्पना होती. पण ती माझी चूक होती, हे काही संघटनांनी.. काही मंडळींनी माझ्या लक्षात आणून दिलं. 'आरपीआय', 'भीम आर्मी', लातुरची संघटना असेल.. पुण्यातल्या संघटना आहेत. तर मी सर्व दलीत बांधवांची आणि ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्या सर्वांची जाहीर माफी मागतो. माझी चूक मान्य करतो. मी सामाजिक बांधिलकी जपणारा आहे. पुन्हा अशी चूक होणार नाही. भारतातल्या नव्हे, तर जगभरातल्या सर्वांची मी माफी मागतो. माफ करा. संबंधित बातम्या :