Tamil actress Subhashini last Instagram video: 6 एप्रिल रोजी म्हणजेच सोमवारी तामिळ  इंडस्ट्रीत (Tamil Industry) एक भयंकर घटना उघडकीस आली. प्रसिद्ध अभिनेत्री सुभाषिनी बालासुब्रमण्यम (Subhashini) हिनं स्वत:चं आयुष्य संपवलं.  36 व्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतला. चेन्नई (Chennai) येथील अपार्टमेंटमधील राहत्या घरात तिचा मृतदेह सापडला. तिच्या मृत्यूची बातमी समोर येताच तामिळ इंडस्ट्रीसह संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. अभिनेत्री सोशल मीडियात प्रचंड सक्रीय होती. ती आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी सोशल मीडियावर पोस्ट करुन चाहत्यांना अपडेट  देत होती.  दरम्यान, मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वी अभिनेत्रीनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती.  या पोस्टमधून अभिनेत्री आपली लाईफ एन्जॉय करताना दिसत आहे, परंतु, कुणालाही कल्पना नव्हती की सुभाषिनी अशा पद्धतीने आपलं आयुष्य संपवेल. सध्या तिची लास्ट पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

अभिनेत्रीची शेवटची पोस्ट व्हायरल (Tamil actress Subhashini Death)

अभिनेत्रीनं 4 एप्रिल रोजी शेवटची पोस्ट  शेअर केली होती.  या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री खूप आनंदात दिसत आहे. निसर्गाच्या सानिध्यात अभिनेत्री खूश दिसतेय.   तिनं हा व्हिडीओ शेअर करुन 'जिंदगी आजकल' असं कॅप्शन दिलं आहे.  अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला होता.  दरम्यान, तिनं या व्हिडीओचा कमेंट सेक्शन ऑफ करुन ठेवला आहे. शेवटच्या पोस्टमध्ये आनंदात दिसणारी सुभाषिनी, स्वत:चं आयु्ष्य संपवेल, अशी कुणालाही कल्पना नव्हती.

अभिनेत्रीने गळफास घेऊन आयुष्य का संपवलं? (Actress Death)

 

Continues below advertisement

6 एप्रिल 2026 रोजी चेन्नई येथून अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. सुभाषिनीच्या मृत्यूची  बातमी समोर येताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. अभिनेत्रीने आत्महत्या का केली? आत्महत्या  करण्यामागचं कारण काय? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहे.  पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. प्राथमिक तपासात सुभाषिनीने आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तवला आहे.  रिपोर्ट्सनुसार,  पतीसोबत फोनवर संभाषण सुरु असताना अभिनेत्री मानसिक तणावाखाली गेली होती. याच कारणामुळे अभिनेत्रीनं आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे.   सध्या या प्रकरणात पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मला इन्स्टाग्रामवर बऱ्याच गे लोकांचे मेसेज येतात...'; 'बिग बॉस मराठी 6'च्या स्पर्धकाचा मोठा खुलासा