Stree 2 box office collection: श्रद्धा कपूरच्या स्त्री-2 ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत रिलिजनंतर 39 व्या दिवशी या चित्रपटानं 600 कोटींचा टप्पा गाठणारा हा दुसरा हिंदी चित्रपट ठरला आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या चित्रपटानं राष्ट्रीय चित्रपट दिनादिवशी मोठा गल्ला जमवला होता. या दिवशी केवळ ९९ रुपये तिकीट असल्यानं याचा स्त्री-2 ला फायदा झाल्याचं दिसले. सध्या चित्रपट रिरिलिजचा ट्रेंड चालू असला तरी ब्लॉकबस्टरच्या शर्यतीत आघाडीवर असणाऱ्या  जवान, ॲनिमल, पठाण, गदर २ या चित्रपटांना स्त्री-2 ने मागे टाकत या सर्व चित्रपटांपेक्षा अधिक कमाई केल्याचं दिसून आलं.


स्त्री-2  ने केली रेकॉर्डब्रेक कमाई


बॉक्सऑफीसवर सध्या स्त्री-2 ची चलती असून  अजूनही या चित्रपटाची चलती असून आतापर्यंत ६०० कोटींच्या वर गल्ला केल्याचं सांगण्यात येतंय. १५ ऑगस्ट रोजी रिलिज झालेल्या या चित्रपटाला रिरिलिज चित्रपटांच्या तुलनेत तसेच नव्याने रिलिज झालेल्या सिनेमांपेक्षाही चांगलं यश मिळाल्याचं सांगण्यात येतंय. 


‘स्त्री २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिकांसह अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी या कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका या चित्रपटात होत्या. कॉमेडी, ॲक्शन, रोमँटीक असा ट्रिपल ड्रामा असणाऱ्या या सिनेमानं  बॉक्स ऑफीसवरही बाजी मारली आहे.


विकेंडची कमाई ४ कोटींच्या घरात


शुक्रवारी वर्ल्ड सिनेमा डे रोजी केवळ ९९ रुपये तिकीट असल्यानं अनेकांनी हा चित्रपट पाहण्यास पसंती दिली. शनिवार, रविवारीही स्त्री-2 सिनेमाला फायदा झाला असून केवळ विकेंडची कमाई ४. ८५ कोटींच्या घरात गेली असल्याचं पहायला मिळालं.


या चित्रपटांना टाकलं मागे


स्त्री २ चित्रपटाने ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या शर्यतीत असणाऱ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे. रणबीर कपूरचा रिरिलीज झालेला ॲनिमल सिनेमा रिरिलीजनंतर ५०२ कोटींपर्यंत पोहोचला. पठाण चित्रपटानंही ५२४ कोटींची कमाई केली. जवानने डब तेलगू आणि तमिळ भाषांमध्येही ६०० कोटींच्यावर कमाई केली असून स्त्री२ ने या चित्रपटालाही मागे टाकले आहे.