Mithun Chakraborty Sridevi Affair Clim: बॉलिवूड (Bollywood News) सेलिब्रिटी आणि त्यांचे कथित अफेअर्स याच्या चर्चा नेहमीच शिखरावर पोहोचलेल्या असतात. आता तरी सोशल मीडियाच्या काळात लगेचच या चर्चांवरुन वादळ उठतं. पण, ऐंशी-नव्वदच्या दशकातल्या सेलिब्रिटींच्या अफेअर्सचे किस्से फार कमी लोकांना माहीत आहेत. असाच एक किस्सा आहे, 'डिस्को डान्सर' स्टार मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आणि हिंदी सिनेसृष्टीची (Hindi Film Industry) सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांच्या अफेअरचा. मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांचे कथित अफेअर हे 1980 च्या दशकातील बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या नात्यांपैकी एक. 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जाग उठा इंसान' सिनेमाच्या सेटवर श्रीदेवी आणि मिथुन एकमेकांच्या प्रेमात पडलेले, अशा अफवा पसरलेल्या. नुकत्याच एका मुलाखतीत एका प्रसिद्ध पत्रकारानं बोलताना, त्यावेळी श्रीदेवी आणि मिथुन नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहिलेत, असा खळबळजनक दावा केलाय. महत्त्वाची बाब म्हणजे, तेव्हा मिथुन चक्रवर्ती विवाहित होते, असंही समोर आलंय.
मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांनी खरंच लग्न केलेलं? (Mithun Chakraborty Sridevi Affair Rumors)
सिद्धार्थ कन्नन यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना ज्योती व्यंकटेश यांनी सांगितलं की, "तुम्ही श्रीदेवी आणि मिथुन यांच्यातल्या जवळच्या नात्याबद्दल विचारताय, ते दोघे जवळपास तीन महिने नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहिलेत... मिथुन यांचं एक आऊटडोअर शुटिंग सुरू होतं, तेव्हा श्रीदेवी यांना तो सोबत घेऊन गेलेला... जरी त्या सेटवर कधी गेल्या नाहीत, त्या रुमवरच असायच्या आणि हे सर्वांना माहीत होतं... त्याचदरम्यान मी मिथुन यांना भेटलेलो, तेव्हा मी त्यांना गमतीनं विचारलं की, 'तुम्ही आतापर्यंत तमिळ शिकला असालच. मी त्यांना हे तमिळमध्ये विचारलं, पण ते गप्प राहिले... आणि त्यांनी माझ्याशी तमिळमध्ये बोलण्यास नकार दिला..."
श्रीदेवी आणि मिथुन यांचं नातं का टिकलं नाही? (Sridevi Mithun Chakraborty Affair News)
"श्रीदेवी आणि मिथुन यांचं नातं न टिकण्याचं कारण म्हणजे, Compatibility... त्यावेळी श्रीदेवी एक मोठी दिग्गज अभिनेत्री होती. त्या 'द श्रीदेवी' होत्या आणि मिथुन फक्त एक अभिनेता होता... तसंचं, त्यावेळी मिथुन यांच्या अनेक अफेअर्सच्या बातम्या येत होत्या, त्यामुळे श्रीदेवी यांना त्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. जेव्हा मिथुन यांनी योगिता बालीशी लग्न केलं, तेव्हा सर्वांना वाटलं की हे लग्न टिकणार नाही, पण बघा, त्यांचं नातं आजही टिकून आहे. त्यांना तीन मुलं आणि एक दत्तक मुलगी आहे..."
श्रीदेवी आणि मिथुन यांचं नातं का टिकलं नाही, असं विचारलं असता ज्योती म्हणाले की, "श्रीदेवी आणि मिथुन यांचं नातं न टिकण्याचं कारण म्हणजे, जुळवणूक... त्यावेळी श्रीदेवी एक मोठी अभिनेत्री होती. त्या श्रीदेवी होत्या आणि मिथुन फक्त एक अभिनेता होता. तसंचं, त्यावेळी मिथुन यांच्या अनेक अफेअर्सच्या बातम्या येत होत्या, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. जेव्हा मिथुन यांनी योगिता बालीशी लग्न केलं, तेव्हा सर्वांना वाटलं की, हे लग्न टिकणार नाही... पण बघा, त्यांचं नातं आजही टिकून आहे. त्यांना तीन मुलं आणि एक दत्तक मुलगी आहे..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
