Spruha Joshi: जंतर-मंतरवरील आंदोलनाने सोमवारी हिंसक वळण घेतलं. नीट पेपरफुटी विरोधाचा रोष लाठीचार्ज, अश्रुद्र्याच्या नळकांड्या वापरून दाबला गेला. गेल्या 20 दिवसांपासून जंतर-मंतरवर आंदोलन करत असलेले शिक्षणतज्ञ व सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना जबरदस्ती उचलून रुग्णालयात पाठवण्यात आलं. आता कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP Protest) आंदोलकांना आणि जंतर-मंतरवर उपस्थित विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडून काढलं. हे सगळं घडत असताना अनेक कलाकारांनी, मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीने केलेली कविता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ करत तिने मोर्चे बॉम्बस्फोट, दंगली, मतं,अजेंडा, धर्म या सगळ्यांवर नेमक्या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Continues below advertisement

काय म्हणाली स्पृहा जोशी ?

'आमचं इथं अगदी व्यवस्थित चाललंयसंवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटलंयआमचं इथं अगदी व्यवस्थित चाललंय..

रोजच उठून चालू आहे निष्पापांचे आक्रंदनघुसमटणाऱ्या श्वासाचं रोजचेच आहे मूक रुदनबोलू पाहणाऱ्या आवजाला आम्ही कधीच गप्प केलंयसंवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटलंय..

Continues below advertisement

किती बॉम्बस्फोट, किती दंगली, माणसं मरतायत, मरू देत..आपण त्यात नव्हतो ना,चला आजची रात्र टळू देतउपोषण होतात, मोर्चे निघतात, झुरळं चक्क रस्त्यावर उतरतातमत, विरोध, अजेंडा, धर्म, चर्चा बिर्चा नकोच काही

मुद्दा-प्रश्न खड्ड्यात गेले, हे तर नुसते देशद्रोहीनिर्लज्जपणे आम्ही स्वत:लाच ठासून सांगितलंयअन् संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटलंय..

मनामध्ये एक प्रचंड भीती, काय हा जीव उद्या पाहील?सांगताय कुणाला, लोंबकळा ट्रेनला, आजची भाकरी कोण देईल?तसा फरक पडत नाही, जगाचं जगणं थांबतं नाहीआमच्या संथ आयुष्यावर एक ओरखडाही उमटत नाही..अगतिकतेच तत्वज्ञान आम्ही स्पिरिट म्हणून बोकाळलंय,अन् संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटलंय

एकच वाटतं अशावेळी तरी धावून यावेत सारे हातरक्त देताना तरी विचारू नये काय तुझी धर्म जात..रक्ताचा रंग सारखाच असतो हे खोल कुठेतरी मनात जपलंयनाहीतर संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटलंय