South Korean Film Unlocked (2023): सध्या बॉलिवूडपेक्षाही साऊथ सिनेमा (South Korea) आणि कोरियन सिनेमांची (Korean Film) चलती आहे. प्रेक्षक के-ड्रामा (K-Drama) आणि दक्षिण कोरियन सिनेमांकडे वळत आहेत. कोरियन सिनेमाची पटकथा, त्यांची स्टार कास्ट आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याची ताकद प्रेक्षकांना आवडत असल्याचं दिसतंय. सध्या नेटफ्लिक्सवर असाच एक सिनेमा धुमाकूळ घालतोय. जो पाहिल्यानंतर जो स्मार्टफोन सतत तुमच्या हातात असतो, ज्याच्याशिवाय तुम्ही क्षणभरही राहू शकत नाही, तो स्वतःपासून दूर ठेवाल.
एक फोन महिलेच्या आयुष्यात कशी उलथापालथ घडवतो, हे या सिनेमात दाखवलं गेलं आहे. या सिनेमात असे अनेक मोठे कलाकार आहे, ज्यांचा अभिनय प्रेक्षकांना पापणीही मिटू देत नाही. नेटफ्लिक्सवरील ज्या चित्रपटाबद्दल आपण बोलत आहोत, त्याचं नाव आहे, 'अनलॉक्ड'. अनलॉक्ड हा सायबर गुन्ह्यावर आधारित चित्रपट आहे. ज्यामध्ये इम सी वान, चुन वू ही यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
सिनेमाची कहाणी थोडक्यात...
'अनलॉक्ड' या साऊथ कोरियाच्या सिनेमाबाबत सांगायचं तर, यामध्ये जुन येओंग (Jun Yeong) नावाचं एक पात्र एक फोन चोरतं. हा फोन एमआयचा आहे. फोन चोरल्यानंतर तो सतत तिच्याशी कॉन्टॅक्ट करतो आणि क्राईम करतो. या सिनेमात एका महिलेची कहाणी दाखवण्यात आली आहे, जिचा फोन चोरीला गेल्यावर तिचं संपूर्ण आयुष्य उलट-पुलट होतं. तो माणूस फोनद्वारे तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतो.
हा सिनेमा पाहिल्यानंतर, तुम्ही तुमचा फोन दूर ठेवू लागाल, कारण हा सिनेमा इतकी भूरळ पाडतो की, तुम्हाला वाटेल की कोणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. हा चित्रपट खूप पूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. लोकांना अजूनही तो पहायला आवडतो. 'अनलॉक्ड'मध्ये अनेक ट्विस्ट आणि टर्न्स आहेत, जे तुम्हाला त्यात अडकवून ठेवतात.
कोरियन चित्रपटांच्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. बरेच लोक कोरियन कलाकारांच्या क्लिप्स पाहिल्यानंतरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर ते पाहण्यासाठी जातात. 'अनलॉक्ड' व्यतिरिक्त, नेटफ्लिक्सवर सायबर क्राईमशी संबंधित अनेक चित्रपट पाहता येतात. लोकांना असे चित्रपट पहायला देखील आवडतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :