Top Web Series : बॉलिवूड बरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) आणि बाहुबली (Bahubali) या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. दाक्षिणात्य चित्रपट आणि वेब सारिज त्यांच्या कथानकामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. दाक्षिणात्य वेब सारिजचे हिंदी वर्जन लोक पाहात. त्या वेब सीरिजमध्ये अॅक्शन ड्रामा आणि थ्रिल या सर्व गोष्टी असतात. त्यामुळे या वेब सीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. ओटीटीवर असणाऱ्या टॉप चार दाक्षिणात्य वेब सीरिज कोणत्या ते पाहूयात...
ट्रिपल्स
ट्रिपल्स या सीरिजचे कथानक तीन मित्रांच्या आयुष्यावर आधारित आहे. कॅफे ओपन करण्याचं या तीन मित्रांचे स्वप्न आणि त्यांची लव्ह स्टोरी हे त्या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. Disneyप्लस हॉस्टार या ओटीटी अॅपवर तुम्ही ही सीरिज पाहू शकता. तसेच या सीरिजचे हिंदी वर्जन देखील आहे.
क्वीन
बाहुबली या चित्रपटातील अभिनयानं सर्वांची मनं जिंकणारी अभिनेत्री राम्या कृष्णन यांची प्रमुख भूमिका असणारी क्वीन ही वेब सीरिज देखील तुम्ही पाहू शकता. या सीरिजचे कथानक जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. या सीरिजमध्ये राम्यानं जयललिता यांची भूमिका साकारली आहे. ही सीरिज एमएक्स प्लेयर या ओटीटी प्लॅटफोर्मवर तुम्ही पाहू शकता.
ऑटो शंकर
ऑटो शंकर ही सीरिज सत्य घटनेवर आधारित आहेत. साऊथमधील एका गुन्हेगाराच्या आयुष्यावर या सीरिजचे कथानक आधारित आहे. झी-5 वर ही वेब सीरिज आहे.
पावा कढाईगाल
पावा कढाईगाल या सीरिजमध्ये चार वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या आहेत. या चार कथांचे दिग्दर्शन चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी केले आहे.
संबंधित बातम्या
Naagin 6 : 'नागिन 6'मध्ये तेजस्वी प्रकाश साकारणार 'ही' भूमिका, तेजस्वीने शेअर केला व्हिडीओ
Yami Gautam : 'A Thursday' सिनेमाचा टीझर आऊट, यामी गौतमचा अनोखा अंदाज
Kajal Aggarwal, Samantha : बॉडी शेमिंग करणाऱ्यांना काजलचं सडेतोड उत्तर; समंथा म्हणाली...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha