South Cinema Kantara 2 Actor Passes Away: रिषभ शेट्टीच्या (Rishab Shetty) 'कांतारा 2'ची (Kantara 2) सारेच आतुरतेनं वाट पाहत आहे. पण, 'कांतारा 2'च्या सेटवरुन वाईट बातम्यांचा ओघ काही दिवसांपासून वाढला आहे. अलिकडेच, 'कांतारा 2'च्या सेटवर एका ज्युनिअर अॅक्टरचा बुडून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. अशातच आता या सिनेमाच्या अभिनेत्याबाबत एक दुःखद बातमी समोर येत आहे. कन्नड अभिनेता राकेश पुजाराचं निधन झाल्याती माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राकेश पुजारा या 33 वर्षांच्या अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. 

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री अभिनेता राकेश पुजारा अचानक बेशुद्ध पडला. त्यावेळी तो त्याच्या मित्राच्या घरी होता. त्याच्या मित्राशी बोलत असतानाच, बोलता बोलताच तो अचानक बेशुद्ध पडला. यानंतर सर्वांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेलं.

सारेच हादरले...

राकेश पुजाराला रुग्णालयात नेलं तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मृत्यूचं कारण हृदयविकार असल्याचं सांगण्यात आलं. तसेच, अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि त्याचे सर्व मित्र, सेलिब्रिटी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत. त्याच्या अचानक जाण्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.  

इंस्टाग्राम बायोमध्ये लिहिलेली धक्कादायक

अलिकडेच राकेशनं इंस्टाग्रामवर अनेक किस्से शेअर केले होते. एक फोटो मेहंदी समारंभाशी संबंधित होता. आणि दुसऱ्या फोटोद्वारे त्याने त्याच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, राकेश पुजाराचा इंस्टाग्रामवर बायो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. जिथे त्यानं लिहिलेलं की, 'माझ्यासाठीही आयुष्य खूप लहान आहे.'

राकेश 'कंतारा चॅप्टर 1' मध्ये झळकणार होता

ऋषभ शेट्टीच्या आगामी 'कांतारा चॅप्टर 1' या चित्रपटात राकेश झळकणार होता. त्यानं 11 मे रोजी चित्रपटाचं चित्रीकरणही पूर्ण केलं. आता त्याच्या अचानक निधनानं सर्वांनाच धक्का बसला आहे.